Headlines

किरण पावसकरांच्या विधानाने राजकारण तापले:बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप, शिंदे सेनेकडून सारवासारव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा हादरा दिला असतानाच, आता या बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार सोमवारी अधिकृतपणे शिंदे गटात दाखल झाले. मात्र, या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे शिंदे सेनेचे नेते किरण पावसकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका…

Read More

निकृष्ट कोळसा पुरवणाऱ्या कंपन्यांना थेट ब्लॅकलिस्ट करा:विधानसभेत विजय वडेट्टीवारांची आक्रमक मागणी, मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली कोळशाची खराब गुणवत्ता

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत वीज निर्मिती आणि वीज टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांतील संच वारंवार बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हेच प्रमुख कारण आहे,” असा थेट आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी तारांकित प्रश्नादरम्यान केला. विशेष म्हणजे, विरोधी पक्षाचा हा आरोप मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री…

Read More

हिंगोलीत डीएपी खताचा तुटवडा:बफर स्टॉक रिलीज न केल्यास शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी असून कृषी खात्याने जिल्ह्यात डीएपीच्या 500 मेट्रीक टन पैकी 300 मेट्रीक टन बफर स्टॉक पाच तालु्क्यांसाठी रिलीज करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांची सोमवारी ता. 22 भेट घेऊन चर्चाही केली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे…

Read More

महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे का?:विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर; 32 हजार मेगावॅटचा विक्रमी भारही सांभाळला

राज्यात वीजटंचाई आणि लोडशेडिंगबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा खुलासा केला आहे. राज्यात काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते, काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. मात्र या सर्व परिस्थितीत राज्यात एकाही दिवशी अधिकृत भारनियमन (लोडशेडिंग) करण्यात आलेले नाही, असा ठाम दावा मुख्यमंत्र्यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या…

Read More

"निधी मिळत नव्हता" म्हणत ठाकरेंना रामराम:पण ओमराजेंचे 16 कोटी, तर संजय दिना पाटलांचे 14 कोटी पडूनच! खासदार निधीच्या आकडेवारीवरून बंडखोरांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. पक्ष सोडताना या सर्व बंडखोर खासदारांनी एकमुखाने एकच कारण पुढे केले होते: “आम्ही विरोधी पक्षात असल्याने विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता, त्यामुळे मतदारसंघातील कामे करता येत नव्हती.” मात्र, आता ‘खासदार स्थानिक…

Read More

व्यावसायिक केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नव्हे, खून:होणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुणे पोलिसांचा खुलासा

पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील व्यावसायिक केतन अग्रवाल (वय 26) याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटलेली ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच मित्रांच्या मदतीने त्याचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत केतन…

Read More

हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी:स्फोटावर स्फोट होतच राहतील; खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान, आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे…

Read More

खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये:मतदारसंघाचा निधी पडून, मग विकास करायला तिकडे गेलात की कंत्राटं घ्यायला?- संजय राऊत

संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती. या सर्व गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही. ते हे का सांगत नाहीत की 13 तारखेला त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांचे खोके आले, त्यानंतर 14…

Read More

दांडीबहाद्दर मंत्र्यांना फडणवीसांची कडक तंबी!:'सभागृह थांबलं तर खपवून घेणार नाही'; बेताल वक्तव्यांवरही नाराजी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत शिस्तीचा डोस दिला आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज ठप्प होणार असेल, तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर काही मंत्र्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या…

Read More

अमित शाहांनी सांगितलं तेच होणार:99.99% लोक शिवसेनेत येतील, तिथे फक्त 'हम दो हमारे दो'च उरतील- आशिष जैस्वाल

6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाने आधीच बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आता मानसिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. “उद्या ९९.९९ टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. ठाकरे गटात शेवटी फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच लोक उरतील असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केला आहे. “अमित शाहांनी सांगितल्याप्रमाणे…

Read More