Headlines

डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलिस महासंचालकांशी भेट:बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्रीवर कारवाईचे आश्वासन

शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी मुंबईत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. राज्यातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्री, गर्भलिंग निदान आणि पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारीसह विविध गंभीर मुद्द्यांवर त्यांनी दाते यांच्याशी चर्चा केली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, मुंबईतील अमली पदार्थ विक्री…

Read More

विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव:नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने नुकताच बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS), क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव, संशोधन आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि प्रतिनिधींचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या भव्य सोहळ्यातील पुरस्कारार्थींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे: उत्कृष्ट…

Read More

खराडीत साडेचौदा वर्षांच्या मुलीचा बालविवाह:नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुण्यातल्या खराडी परिसरात साडेचौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या वर्षी घडली होती. या प्रकरणी एका अंगणवाडी सेविकेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मिळाली होती….

Read More

शक्तीपीठ विरोधात विटा तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा:पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा सवाल; पोलिसांवर गंभीर आरोप

शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात पोलीस बळाचा वापर करून सुरू असलेल्या ड्रोन मोजणीविरोधात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या दडपशाहीच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चेकरांनी थेट तहसील कार्यालयात प्रवेश करत ठिय्या आंदोलन मांडले. “दिवसभर काबाडकष्ट करून झोपलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना…

Read More

'राष्ट्रवादी'चा सोहळा:नाशिकमध्ये अजित पवारांच्या NCP चा वर्धापन दिन साजरा; दादांच्या आठवणीने कार्यकर्ते भावुक

नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापनदिन राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा म्हाडा सभापती राज्यमंत्री रंजन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन होता. त्यामुळे पक्षात भावनिक वातावरण पाहायला…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आग्रही:20 जूनला दिल्लीत बेमुदत आंदोलन, अभिजीत दिपकेंचा एल्गार; लखनौ, अमृतसरमध्येही आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी २० जून रोजी दिल्लीत बेमुदत आंदोलन पुकारले आहे. राजीनामा न झाल्यास देशभरात आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली. नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशातील सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी…

Read More

तब्बल 130 कोटींची ऊसबिलाची थकबाकी:सोलापुरात ऊस उत्पादकांचा संताप अनावर, 'जलसमाधी' आंदोलनामुळे प्रशासनाची उडाली धावपळ

सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. धोत्री (दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ साखर कारखान्याकडून तब्बल 130 कोटी रुपयांची ऊस बिले थकवण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. थकीत रक्कम तातडीने मिळावी या मागणीसाठी शेतकरी भीमा नदीपात्रात उतरले असून, प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची…

Read More

हिंगोलीत तीन सरकारी शववाहिका वर्षभरापासून धूळखात; ना इंधन, ना चालक:सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी दिलेल्या तीन शववाहिका मागील एक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात मरणासन्न अवस्थेत आहेत. या वाहनांसाठी ना इंधन उपलब्ध आहे ना चालक त्यामुळे या शववाहिका धुळखात पडल्या आहेत. या शववाहिकांचा उपयोगच केला जात नसल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांकडे शववाहिका दिल्या आहेत. शहरी भागात उपचार घेत असतांना रुग्ण दगावल्यानंतर…

Read More

Nagpur NMC Launches LiDAR Tech for Tree Health Cards

नागपूर शहरात झाडांचे आरोग्य तपासण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने (NMC) ‘लायडार’ (LiDAR) तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाडांचे ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ तयार केले जाणार आहे. बुधवारी दीक्षाभूमी परिसरात महापौर नीत . नागपूर महानगरपालिकेने ‘स्माईल कौन्सिल’ उपक्रमांतर्गत ‘ट्रीकोटेक एलएलपी’ आणि ‘थ्रीहील पीटीई’ यांच्या तांत्रिक सहकार्याने ही मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या एका…

Read More

CISF Heroine Saves Passenger Life at Mumbai Airport

मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाला अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. विमानतळाच्या सुरक्षा क्षेत्रात ती अचानक बेशुद्ध पडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) दोन महिला जव . या घटनेची माहिती स्वतः CISF ने सोशल मीडियावर दिली असून संबंधित महिला जवानांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नेमके काय…

Read More