“कौतुकी’च्या संवर्धनासाठी लोकचळवळ; नदी होणार प्रदूषणमुक्त:कौतुकी नदी स्वच्छता मोहिमेमुळे सोनईत भूजल पातळीत वाढ, सोनईकरांचा अनोखा उपक्रम
गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कौतुकी नदीच्या स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नदीपात्रातील गाळ काढणे, . सोनईतील रामझिरा मंदिर परिसर, दशक्रिया विधी घाट, मारुती मंदिर परिसर, दरंदले अमरधाम परिसर, लांडेवाडी रोड परिसरातील दरंदले वस्ती आदी भागांमध्ये स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात…