![]()
सण-उत्सवांच्या काळात जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंगणा (उजाडे) गावातील ग्रामस्थांनी पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्याचा वस्तुपाठ घातला आहे. निर्गुणा नदीचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी ग्रामस्थ गत पाच वर्षांपासून नदीत विसर्जन न करता मातीच्या कुंड्यांमध्ये
.
कुंडीत विसर्जन, वृक्षारोपण नदीत प्रदूषण टाळण्यासाठी कुंडीत पाणी भरून शाडूच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. ही माती अवघ्या एका तासात पाण्यात विरघळते. त्यानंतर त्याच पवित्र मातीमध्ये सुंदर रोपटे लावून ती कुंडी नागरिकांना संगोपनासाठी दिली जाते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
३० मूर्तींपासून १०० पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास २०२२ मध्ये ३० मातीच्या मूर्तींचे वितरण करण्यात आले. २०२५मध्ये ५० हून अधिक घरांमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती स्थापन करण्यात आल्या. २०२६मध्ये १०० पर्यावरणपूरक मूर्ती विराजमान झाल्या. नदीचे पाणी स्वच्छ ठेवणे, घरातच कुंडीत विसर्जन करणे व त्यातून नवीन रोपट्याची निर्मिती करणे हा या मागील हेतू आहे.