"एक कुटुंब-एक झाड' संकल्पनेतून अहिल्यानगर हरित करणार- बारस्कर:तपोवन रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरात मोफत फळझाडे व देशी वृक्षांचे वाटप
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अमूल्य संदेशातून प्रेरणा घेत, शहरात ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प साकारण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना मोफत फळझाडे आणि देशी वृक्षांचे वाटप करून ‘हरित अहिल्यानगर घडवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी…