Headlines

सातारा झेडपीत वाहन घोटाळ्यावरून राजकारण तापले:राजू शेळकेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वाहनांच्या कायदेशीर कागदपत्रांच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषद सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (राजू) शेळके यांनी प्रशासनासह सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील १०२ रुग्णवाहिकांसह अनेक वाहनांचे विमा, फिटनेस, पासिंग, पीयूसी आदी…

Read More

35 मिनिटांत शेतकऱ्याचे 82 हजार रुपये पळविले:आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू

आखाडा बाळापूर येथे मध्यवर्ती बँकेतून काढलेले पैसे महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी जात असतांना अवघ्या ३५ मिनिटांच्या कालावधीत एका शेतकऱ्याचे ८२ हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी ता. २ दुपारी घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कसबे…

Read More

विषारी दारू प्रकरणातील मृतांचा खरा आकडा समोर आणा:डॉ. नीलम गोऱ्हे यांची CIDकडे मागणी, व्यापक तपासाची गरज असल्याचे मत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात मृत्यूंचा आणि बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. डॉ. गोऱ्हे यांनी सीआयडीचे अप्पर…

Read More

ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, तर जनगणनेवर बहिष्कार..!:भंडारा जिल्ह्यातील 50 सरपंचांचा प्रशासनाला 'जशास तसे' उत्तर

पुढच्या पिढीचे भविष्य आणि सामाजिक न्याय हवा असेल, तर आज एकत्र यावेच लागेल, हाच निर्धार मनात ठेवून भंडारा जिल्ह्यातील तब्बल ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी प्रशासकीय दबावाला झुगारून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. “आगामी जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसेल, तर संपूर्ण गावातून जनगणनेवर बहिष्कार टाकला जाईल,” असा आक्रमक आणि रोखठोक पवित्रा सरपंचांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासमोर…

Read More

महाराष्ट्राच्या पराक्रमी लेकीचे कोडकौतुक:वय वर्ष 11, शिखर सर केले 16; ठाण्याच्या गृहिताचा मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून गौरव

ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा स्नेहा सचिन विचारे हिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी भारतातल्या 16 राज्यांतील 16 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. “मिशन इंडिया समिट – 16 राज्ये, 16 शिखरे” या मोहिमेअंतर्गत अवघ्या 32 दिवसांत ग्रिहिथाने हा इतिहास रचला. या अद्वितीय यशाबद्दल आज मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ग्रिहिथाचा…

Read More

गोपालनाथ महाराजांच्या ‘शिरोमणी सार’ ग्रंथाचे प्रकाशन:325 व्या जन्मोत्सवानिमित्त ‘वेदांत शिरोमणी’ ग्रंथातील ओव्यांवर आधारित

अठराव्या शतकात क्षेत्र त्रिपुटी (जि. सातारा) येथे संजीवन समाधी घेतलेले (1766) योगी सत्पुरुष गोपालनाथ महाराज यांच्या सव्वा तीनशेव्या (त्रि. शतकोत्तर रौप्य महोत्सवी) जन्मोत्सवानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवार 8 जून 2026 रोजी सायं. 5 वाजता गोपालनाथ महाराजांच्या ‘वेदांत शिरोमणी’ या ग्रंथामधील निवडक ओव्यांवर आधारित ‘शिरोमणी सार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नाथ महाराज…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी चालवली ई-रिक्षा, VIDEO:अभिनेत्री भूमी पेडणेकर प्रवासी, ‘पिंक ई-रिक्षा’ उपक्रमाची सुरुवात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी भामला फाउंडेशनच्या महिला-नेतृत्वाखालील ग्रीन मोबिलिटी कार्यक्रमांतर्गत पिंक ई-रिक्षा मदत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ई-रिक्षा चालवली. तर, रिक्षात त्यांच्या मागे बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर बसल्या होत्या. पाहा कार्यक्रमाचे 2 फोटो.. भूमीने पिंक ई-रिक्षा उपक्रमाचे कौतुक केले माध्यमांशी बोलताना भूमीने कार्यक्रमाबद्दल सांगितले की, हा…

Read More

बहुमत असूनही भाजपा नगरसेवक 'अज्ञातस्थळी' रवाना:भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची भीती

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही, मतदानापूर्वीच भाजपाच्या नगरसेवकांना ‘अज्ञातस्थळी’ पाठवण्यात आले आहे. यामुळे महायुतीला क्रॉस व्होटिंगची भीती सतावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप जिल्हा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश…

Read More

नागपूर विधान परिषद निवडणूक- कोट्यधीश उमेदवारांमध्ये चुरस:संपत्तीत भाजपचे पोतदार आघाडीवर, वार्षिक उत्पन्नात काँग्रेसचे लोंढे पुढे

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ पक्षाच्या प्रतिष्ठेची नसून, उमेदवारांच्या आर्थिक स्थितीमुळेही चर्चेत आहे. भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे हे दोन्ही प्रमुख उमेदवार कोट्यधीश आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रांनुसार, एकूण संपत्तीच्या बाबतीत डॉ. पोतदार आघाडीवर असले तरी, वार्षिक उत्पन्नात अतुल लोंढे यांनी बाजी मारली आहे….

Read More

शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता:शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताः 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ; विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

शेतकरी कर्जमाफीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज आता माफ होणार आहे. (हे वृत्त अपडेट होत आहे…) Source link

Read More