Headlines

पुणे गुन्हेगारीत राज्यात प्रथम, देशात पाचवे:सुप्रिया सुळेंनी गृहखाते व 'लाडकी बहीण' योजनेवरून सरकारला घेरले

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे काँग्रेस भवनात काँग्रेस नगरसेवकांशी संवाद साधला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर गंभीर आरोप केले. पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ही भेट दिली. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्रीकांत पाटील रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांची मते…

Read More

पुण्यात 11 लाखांची ब्राऊन शुगर जप्त:वाघोली पोलिसांच्या दोघांना बेड्या, बसस्टॉपवर सापळा रचून पकडले

वाघोली पोलिसांनी ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 38 हजार 900 रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिव कालू सिंह (वय 33, रा. बालाजीनगर, वाघोली, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि मांगीलाल (रा….

Read More

विधान परिषदेत घोडेबाजार होणार:डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांनी लोंढे यांच्या विजयाचा दावा करताना, भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. डॉ. नितीन राऊत यांनी निवडणुकीतील राजकीय गणितांवर बोलताना म्हटले की,…

Read More

मोठी बातमी:शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज घेतला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; मात्र आचारसंहितेमुळे घोषणा नाही

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेली असून, याबाबतचा निर्णय आज घेतला जाणार आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा तातडीने…

Read More

विधान परिषदेत अर्ज भरताना महायुतीत बंडखोरी:भाजप आणि शिवसेना नेत्यांशी समन्वयाची चर्चा करणार, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच बंडखोरीबाबत रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, महायुतीमधल्या इतर पक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या संदर्भात अर्ज भरले असतील तर त्या…

Read More

खरीप पूर्व नियोजन व हुमणी अळी नियंत्रण मेळावा:टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन, ऊस पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन मेळावा संपन्न‎

प्रतिनिधी | राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व नियोजन, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचा आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला….

Read More

युवकांनी तंबाखूमुक्त समाजासाठी पुढाकार घ्यावा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातर्फे तंबाखूमुक्त दिनाच्या कार्यक्रमात कर्नल व्ही. एन. शुक्ला यांचे मत‎

प्रतिनिधी |अकोला जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान राबवण्यात आले. अभियानाचे उद्घाटन प्रमुख अतिथी कर्नल व्ही. एन. शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकत युवकांनी तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन…

Read More

तांत्रिक तपासाच्या जोरावर अकोला जिल्हा गुन्हेगारीमुक्त होणर- पाटील:महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांचे तपासाबाबत नवे निर्देश‎

प्रतिनिधी | अकोला अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) डॉ. महेश पाटील यांनी मंगळवारी अकोला जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी केवळ गुन्ह्यांच्या तपासाची माहिती घेतली नाही, तर अकोला जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी व्हिजन २०२६ अंतर्गत आधुनिक तांत्रिक तपासावर भर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आढावा बैठकीला पोलिस अधीक्षक…

Read More

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले- कोणत्याही पात्र बहिणीला वगळले नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता न करणे, आवश्यक निकष पूर्ण न होणे आणि अर्जांमधील त्रुटींमुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांना दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत आता बंद झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, या वाढत्या…

Read More

महागाईविरोधात भारतीय‎कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन‎:जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने बजेट कोलमडले‎

प्रतिनिधी | अमरावती गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी १ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधात आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ते जिल्हाधिकारी अमरावती यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य…

Read More