Headlines

पुण्याची घटना:“गे-डेटिंग ॲप’वरून तरुणांना जाळ्यात ओढणारे अटकेत, एका सराईत आरोपीसह अल्पवयीन साथीदार ताब्यात

पुण्यात डेटिंग ॲपच्या माध्यमातून गुन्हेगारीचे नवे आणि धक्कादायक स्वरूप समोर आले आहे. “गे डेटिंग अँड चॅट’ या ॲपचा वापर करून तरुणांना एकांतात बोलावणे, त्यांना बेदम मारहाण करणे आणि लुटणे अशा गंभीर कृत्यांचा छडा वारजे माळवाडी पोलिसांनी लावला आहे. पीडित तरुणाने तक्रार दिल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला…

Read More

मीरा-भाईंदर घोटाळा:6 हजार कोटींच्या भूखंडावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली, राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर खपवून घेणार नाही- बावनकुळे

मीरा-भाईंदर येथील ६ हजार कोटी रुपये मूल्याची २५४ एकर सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत, सरकार जमीन वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी मुंबईत सांगितले की, “राज्यावर कर्जाचा…

Read More

जिल्हाधिकारी येरेकर यांनी चिखलदरा विकासकामांचा घेतला आढावा:मडकी येथे पर्यटन आणि जलसंधारणावर भर देण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मडकी येथे त्यांनी सिमेंट नाला बांधकामाचा आढावा घेतला आणि सर्व कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मडकी परिसराला निसर्गाचे कोंदण लाभले असून, ते अधिक सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित करावे, असे सांगितले. यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…

Read More

जिल्हा परिषदेच्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण:बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना काम पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ४५ पैकी ४४ अतिरिक्त विषय शिक्षकांचे यशस्वीपणे समायोजन केले आहे. या शिक्षकांना बदली होऊनही देशासाठी महत्त्वाचे असलेले जनगणना कार्य पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही समायोजन प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. या प्रक्रियेत एकूण…

Read More

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात:मुंबई-पुणे महामार्गावरील घटना, गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची दिली माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला असून गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली की, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन…

Read More

विकास लवांडे यांच्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत:सुनील माने यांचा आरोप; नितेश राणेंकडून हल्ल्याचे समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज पुण्यात हल्ला झाला. या हल्ल्यामागे सरकारचा हात असल्याचा आरोप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्याचे समर्थन केल्याने महाराष्ट्राला लाज वाटायला हवी, असेही माने म्हणाले. माने यांनी सांगितले की, विकास लवांडे यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे….

Read More

नाट्यसंस्कारच्या ‘जीर्णोद्धार’ची गौरवशाली पन्नाशी पूर्ण:कलावंत तसेच पालकांचा कौतुक सोहळा

नाट्यसंस्कार कला अकादमी निर्मित ‘जीर्णोद्धार’ या बालनाट्याचा ५०वा प्रयोग आणि त्यातील कलावंत तसेच त्यांच्या पालकांचा कौतुक सोहळा बुधवार, १३ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील भरत नाट्य मंदिरात सायंकाळी ६ वाजता हा विशेष प्रयोग पार पडेल. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी ९ मे रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली….

Read More

अखेर ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीचा मृत्यू:प्रियकरावर खुनाचा गुन्हा, दहा दिवसांपासून रुग्णालयात सुरू होते उपचार

प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा अखेर उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर…

Read More

सुरक्षारक्षकाकडून 4 चिमुकल्यांवर अत्याचाराचा प्रयत्न:कामाच्या पहिल्याच दिवशी नीच कृत्य, पिंपरी-चिंचवडमधील संतापजनक घटना

पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण संस्थेमध्ये (सोसायटी) माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्याच्या खांद्यावर सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्याच सुरक्षा रक्षकाने चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, यातील एका १० वर्षांच्या चिमुरडीने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धैर्यामुळे या नराधमाचे पाप उघड झाले असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी…

Read More

वृक्ष लागवडीची चौकशी दडपण्याचा प्रयत्न:सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ, स्मरणपत्रांना प्रतिसाद नाही

कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून केलेल्या वृक्षलागवडीच्या कामाची चौकशी दडपण्यासाठी वनीकरण विभागाकडून चौकशी पथकाला कागदपत्रे सादर केली जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पाच वेळा पत्र देऊनही वनीकरण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौकशी पथकाने या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. याप्रकरणी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे….

Read More