जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचा होणार कायापालट:पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे सर्वांगीण विकासाचे निर्देश, मुंबईत आढावा बैठक
जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मुंबई येथील शासकीय निवासस्थान मेघदूत येथे अजिंठा परिसरातील पर्यटन विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सदर बैठकीस सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दूल सत्तार उपस्थित होते. तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश…