काटेपूर्णा प्रकल्पातील साठा 32%, शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद:तलावातील बाष्पीभवन वाढून जलसंकटात वाढ होण्याची चिन्हे
. गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन जलसाठ्यात आठवडाभरात सुमारे एक ते दीड टक्क्यांनी घट झाली आहे. ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या आणि अकोला शहराची पाण्याची मदार अवलंबून असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर आली…