विवेक वाडेकर पुण्याचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त:तीन दशकांहून अधिक काळ भारत सरकारला दिली सेवा
भारतीय महसूल सेवेतील (IRS) १९९१ च्या बॅचचे ज्येष्ठ अधिकारी विवेक रघुनाथ वाडेकर यांनी पुण्याच्या ‘प्रधान मुख्य आयकर आयुक्त’ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. भारत सरकारच्या विविध महत्त्वाच्या आणि धोरणात्मक संस्थांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावल्यानंतर त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे. वाडेकर यांचा प्रशासकीय अनुभव व्यापक आहे. करप्रणाली, वित्तीय अंमलबजावणी, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या…