पुणे विद्यापीठात महात्मा फुले जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान:सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण महत्त्वाचे – ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे
ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हाच मुख्य मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजपरिवर्तनासाठी फुले-आंबेडकर विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संत ज्ञानेश्वर सभागृहात ‘महात्मा फुले यांचे कार्य…