अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या:शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सटाणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने
बागलाण तालुक्यातील ५० हून अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) संपर्क नेते जयंत दिंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १०) तहसील कार्यालयावर धडक देत निदर्शने करण्यात आली. तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे….