राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ला अखेर पोलिसांची परवानगी:30 कठोर अटी, ड्रोनपासून ‘डी-झोन’ बॅरिकेडिंगपर्यंत नियम
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 22 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी तब्बल 30 अटी आणि शर्तींसह देण्यात आली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक, अग्निसुरक्षा, ध्वनीप्रदूषण आणि महिला सुरक्षेबाबत पोलिसांनी आयोजकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे,…