- Marathi News
- National
- ED Raids AAP MP Ashok Mittal, Searches At 10 Places, Action Taken In Punjab Haryana
जालंधर2 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

ईडीने बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोककुमार मित्तल आणि त्यांच्या कुटुंबातील शिक्षण संस्थांवर फेमा (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) उल्लंघनाच्या तपासांतर्गत सर्च ऑपरेशन केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जालंधर, आसपासचे भाग आणि गुरुग्राममधील सुमारे १० ठिकाणांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू), गुरुग्राममधील दोन संलग्न संस्था टेट्र कॉलेज ऑफ बिझनेस आणि मास्टर्स युनियन कॉलेज ऑफ बिझनेसच्या परिसरांचाही समावेश आहे. तपास यंत्रणेला एलपीयूच्या निधीच्या गैरवापराच्या तक्रारी मिळाल्या होत्या. नुकतेच आपने राघव चढ्ढा यांच्या जागी राज्यसभेत अशोक मित्तल यांना पक्षाचे उपनेते बनवले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी छाप्यांवर टीका केली आहे.
राघव चढ्ढांना झेड सुरक्षा…
बुधवारी सकाळी पंजाब सरकारने राघव चढ्ढांची झेड प्लस सुरक्षा काढून घेतली. दुपारनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना झेड सुरक्षा दिली आहे. त्यांना असलेले संभाव्य धोके पाहून हा निर्णय घेण्यात आला.
एलपीयू… देशातील मित्तल यांचे खासगी विद्यापीठ
खा. मित्तल एलपीयूचे चान्सलर, पत्नी रश्मी प्रो-चान्सलर, मुलगा प्रथम शिक्षण संस्थांचे मालक आहेत. फगवाडामध्ये एलपीयू ६०० एकरांवर उभी आहे. ही सर्वात मोठी सिंगल कॅम्पस प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. मित्तलांचा लव्हली स्वीट्स नावाचा मिठाई ब्रँड आहे.
भगवंत मान, तुमचा पक्ष चोर-लुटारूंचा आहे. पंजाबचे लोक राज्याच्या मंत्र्यांविरुद्ध खटले दाखल करत आहेत. तपास यंत्रणा काही भ्रष्ट खासदारांना पकडत आहेत. मोदींचे धोरण क्लीन इंडिया आहे, याअंतर्गत घाण नक्कीच साफ होईल. – रवनीत सिंग बिट्टू, रेल्वे राज्यमंत्री