![]()
छत्रपती संभाजीनगर शहरात महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. शुक्रवारी (१७ एप्रिल) शहरातील सुमारे २० टक्के भागात ४ ते ६ तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून सध्या मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या कामांमध्ये शहरातील ११ केव्ही आणि ३३ केव्ही वाहिन्यांच्या संपर्कात येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे हे मुख्य काम होते. २ ते ३ किलोमीटर अंतरावरील फीडरमधील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. यासोबतच जंप काढणे आणि लूज कनेक्शन दुरुस्त करणे यांसारखी तांत्रिक कामेही करण्यात आली. कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख आणि प्रसाद महातोले यांनी ही माहिती दिली. शहरातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत भीमटेकडी फीडर आणि दिल्लीगेट फीडरवरील अंबर हिल, एव्हरेस्ट कॉलेज, सईदा कॉलनी, हर्सूल गाव, कोलथनवाडी रोड, जहांगीर कॉलनी, चेतनानगर आणि फातेमा कॉलनी येथे वीज नव्हती. याचप्रमाणे, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पडेगाव उपकेंद्रावरील सर्व फीडर, निशांत पार्क फीडर आणि रेल्वे स्टेशन फीडरवरील उद्योग इंद्रकमल, स्काय सिटी, निशांत पार्क परिसर, मास्टर कुक हॉटेल, दिशानगरी, झेड गॅलेक्सी, शिवकला नेत्रालय, द्वारकादास नगर, शहानूरवाडी आणि समाधान कॉलनी येथील वीजपुरवठा बंद होता. रेल्वे स्टेशन उपकेंद्रावरील सर्व फीडर्सवरील ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत वीज खंडित झाल्याचा अनुभव आला. तर, सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत म्हाडा कॉलनी, चिकलठाणा गाव, सावित्रीनगर, विमानतळासमोरील भाग, प्रकाशनगर, रामनगर, नारेगाव, एन-११, एन-१२, एन-१, पॉवरलूम, ग्रीव्हज, सिंधी कॉलनी, उस्मानपुरा, एसबीएच कॉलनी आणि विकासनगर येथे वीज नव्हती.
Source link
संभाजीनगरमध्ये महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना गती:20 टक्के शहरातील वीज पुरवठा 6 तास खंडीत, नागरिकांना उकाड्याचा त्रास