![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी एका परिप
.
यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक आता संपली आहे. यंदा राज्याच्या सर्व विभागांमधून 16,15,489 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. एकट्या संभाजीनगर विभागातून 1 लाख 92 हजार 095 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
येथे पाहा निकाल
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.targetpublications.org/
https://results.digilocker.gov.in
वर दिलेल्या संकेतस्थळांवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडणारे हे निकाल आता मे महिन्यातच हाती येत असून, बारावीचा निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर आता दहावीचा निकालही आज, 8 मे रोजी जाहीर होत आहे. या तत्परतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वेळेत होण्यास मोठी मदत होणार असून, दहावीच्या निकालापाठोपाठ आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्गही मोकळा होणार आहे.