Headlines

Maharashtra Voter List Special Revision Camp; S Chokkalingam Update


मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने नव्याने

.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी (23 नोव्हेंबर) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत SIR कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा तसेच मतदारांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला.

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्यांना संधी

SIR कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक पात्र मतदारांची नावे समाविष्ट नसल्यास त्यांना नाव नोंदणीची संधी देण्यात येत आहे. अशा मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने नव्याने गणना प्रपत्र उपलब्ध करून दिले आहे. या प्रपत्राच्या माध्यमातून पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यासाठी 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत. त्यामुळे प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या आढावा बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. तसेच अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत SIR कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा….

शंभूराज देसाईंनी महायुतीचा धर्म पाळला नाही:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या अर्जुन काळेंना पाडण्यासाठी प्रयत्न केले – जयकुमार गोरे यांचा गंभीर आरोप

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीनंतर ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे आणि पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गोंदवले येथे बोलताना जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या एका संचालकाला पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करत, हे शंभूराज देसाई यांना शोभते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच जिल्हा बँकेतील यापूर्वीचे कथित गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशारा देत 100 कोटींचे सॉफ्टवेअर आणि 100 कोटींचे लॅपटॉप कुठे गेले, याचा शोध घेणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.