Headlines

Nana Patole Slams Shinde Group Over Balasaheb Thackeray Sonia Gandhi Photo


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाची पाने एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी फाडल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकारावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भाजप आणि शिंदे गटावर अत्यंत ति

.

बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींचा फोटो फाडल्याचा तीव्र निषेध

पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी शिंदे गटाच्या कृत्याचा खरपूस समाचार घेतला. सोनिया गांधी यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून देशभरात आणि जगभरात त्याची मोठी चर्चा सुरू आहे. या लोकप्रियतेला घाबरूनच केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी ही अत्यंत खालच्या पातळीवरची उथळ कृती केली आहे.

बाळासाहेब ठाकरेंचाही अपमान

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्याकडून पुस्तक फाडताना त्या पानावर असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडला गेला. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दोन्ही नेत्यांचा मोठा अपमान असून, या दोघांनी देश आणि राज्याची जाहीर माफी मागावी.

संजय निरुपम यांच्यावर टीका

संजय निरुपम यांच्यासारखे नेते केवळ सत्तेसाठी जगणारे आहेत; अशा लोकांबद्दल न बोललेलेच बरे, पण त्यांनी केलेल्या या खालच्या पातळीच्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे पटोले म्हणाले.

सोनिया गांधींनी देशाला त्याग दिला, तर मोदी देश लुटत आहेत

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर फाडल्याच्या जुन्या घटनांचा दाखला दिल्यावर नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले की, “सोनिया गांधी यांनी आपल्या पतीची (राजीव गांधी) आणि सासूची (इंदिरा गांधी) देशासाठी झालेली शहादत पाहिली आहे. दुसरी कोणतीही महिला असती तर मुलांना घेऊन परदेशात निघून गेली असती; मात्र सोनियाजींनी भारतीय नागरिकत्वाचा आणि संविधानाचा सन्मान करत सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन देशाला एकत्र ठेवण्याचे काम केले. दुसरीकडे, नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून आणि मूठभर उद्योगपती मित्रांना देश विकून देशाला लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना कधीच होऊ शकत नाही.”

आजच्या मुघलांनाही पाण्यात राहुल गांधींचेच घोडे दिसतात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून होणाऱ्या टीकेवर पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाचा दाखला देत सणसणीत टोला लगावला. “भाजप हा सध्या प्रचंड घाबरलेला पक्ष आहे. ज्याप्रमाणे त्या काळातील मुघल शासकांना पाण्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचेच घोडे दिसायचे, अगदी त्याचप्रमाणे आजच्या दिल्लीतील मुघलांनाही सर्वत्र राहुल गांधीच दिसत आहेत. राहुल गांधींच्या भीतीपोटीच भाजपचे नेते रोज नवनवीन अपप्रचार करत आहेत,” असे नाना पटोले म्हणाले.

——————————————————

हेही वाचा…

सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.