झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुराव्यानिशी जोरदार पलटवार केला आहे. “ज्या 33(11) य
.
राऊत बंधूंशी संबंधित 7 ते 8 प्रकल्पांची यादीच वाचून दाखवली
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या पत्राचा हवाला देत संजय राऊत रोज 300 कोटी, 3000 कोटी तर कधी 30000 कोटींच्या घोटाळ्याचे खोटे आकडे फेकत असल्याची टीका बन यांनी केली. त्यांनी एसआरए 33(11) अंतर्गत राऊत बंधू आणि ‘श्रद्धा’ समूहाशी संबंधित असलेल्या प्रकल्पांची यादीच माध्यमांसमोर सादर केली.
- दहिसर-बोरिवली प्रकल्प: श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट (सीटीएस क्रमांक 2157 ए, 2158 ए, दहिसर गाव, तालुका बोरिवली).
- अन्य श्रद्धा प्राईम प्रकल्प: सीटीएस क्रमांक 23/4 येथील 33(11) अंतर्गत प्रकल्प.
- ज्योतिरादित्य रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स: सीटीएस क्रमांक 679 आणि 704/5 बी येथील प्रकल्प.
- मेट्रो बिल्डर्स अँड डेव्हलपर्स: सीटीएस क्रमांक 1399 येथील प्रकल्प.
- वांद्रे पूर्व प्रकल्प: सीटीएस क्रमांक 5254, वांद्रे पूर्व गाव येथील श्रद्धा मंगलमूर्ती (मंगलस्मृती) प्रकल्प.
- मुलुंड आणि भांडुप प्रकल्प: सीटीएस क्रमांक 192, मुलुंड पश्चिम येथील श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट आणि भांडुप पश्चिम येथील श्रद्धा शेल्टर अँड स्टे स्पेसेस प्रकल्प.

डीसीपीआर 2023 मधील नियम 33(11) (पूर्वीचा डीसीआर 1991 मधील 33(14) ड) हा कायमस्वरूपी संक्रमण शिबिराच्या (पीटीसी) सदनिका निर्मितीसाठी असून, एसआरए हेच त्याचे नियोजन प्राधिकरण आहे. राऊत बंधूंनी या योजनेतून किती कोटींचा फायदा घेतला आणि महापालिकेचा किती महसूल बुडवला, याची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहावे, असे आव्हान बन यांनी दिले. तसेच, महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळीतील घरांची किंमत 50 लाख रुपये ठेवली होती; ती देवेंद्र फडणवीस सरकारने मोफत आणि 15 लाख रुपयांत दिली, तर रमाबाई आंबेडकर नगरातील 10 बाय 10 च्या झोपडीधारकांना तिथेच 305 ते 350 चौरस फुटांची हक्काची घरे मिळत आहेत. फडणवीसांच्या नावावर मुंबईत 1 चौरस फूटही जागा नाही, तर पत्राचाळ घोटाळ्यात 100 दिवस तुरुंगात गेलेल्या राऊतांनी भांडुपमध्ये बंगला आणि ठाकरेंनी ‘मातोश्री 2’ बांधले, असा टोला बन यांनी लगावला.
काँग्रेसचा एमआयएम झालाय का?
काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांच्यावर नवनाथ बन यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, एकीकडे मराठवाडा आणि लातूरमध्ये तीव्र दुष्काळ व पाणीसंकट असताना काल लातूरमध्ये टिपू सुलतानच्या कार्यक्रमात अमित देशमुख यांच्या उपस्थितीत नोटांची बंडले उधळली गेली आणि देशमुखांनी त्याचे समर्थन केले. एवढेच नव्हे, तर ज्या टिपू सुलतानने हिंदूंची मंदिरे पाडली, लुटली आणि आया-बहिणींवर अत्याचार केले, त्या टिपू सुलतानची पुस्तके लातूरच्या तरुणांना वाटण्याचे आवाहन देशमुखांनी केले. “येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही मंदिरे पाडण्याचा आणि अत्याचाराचा इतिहास शिकवणार का? आजवर एमआयएम टिपू सुलतानचा उदोउदो करायचे, आता काँग्रेसचाही एमआयएम झाला आहे का?” असा सवाल करत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही; अमित देशमुख आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी बन यांनी केली.
‘सामना’तील मराठा मोर्च्याच्या व्यंगचित्राची करून दिली आठवण
शायना एन. सी. यांच्याकडून अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाटण्याची चूक घडली, ती चुकीचीच होती आणि त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली आहे. तरीही माफी मागणे ही पळवाट असल्याचे संजय राऊत म्हणत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना बन म्हणाले की, “जेव्हा मराठा समाजाच्या ऐतिहासिक मूक मोर्चाला ‘सामना’मध्ये व्यंगचित्र छापून ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवण्यात आले होते, तेव्हा संजय राऊत यांनी मागितलेली माफी ही पळवाट होती का?” बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्या राऊतांनी आधी नाक घासून महाराष्ट्राची माफी मागावी. राऊत रोज मोदी, अमित शहा आणि फडणवीसांना 50 पत्रे लिहितात; हिंमत असेल तर सोनिया गांधींनी पुस्तकात सावरकरांचा ‘माफीवीर’ म्हणून अपमान केल्याबद्दल निषेधाचे 1 पत्र सोनिया गांधींना लिहून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मविआचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध
आगामी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचे नवनाथ बन यांनी सांगितले. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) खांद्यावर बंदूक ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे यांनी कधीही डॉ. आंबेडकरांच्या नावाला विरोध केला नाही, पण काँग्रेस-उबाठा गट मनसेला प्यादे म्हणून पुढे करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मराठी भाषिकच होते आणि चैत्यभूमी नाव देणे ही मराठी माणसाचीच मागणी आहे; त्यामुळे यात मराठी-मराठी भांडण लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस, उबाठा गट आणि मनसेला महाराष्ट्राची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे बन यांनी ठणकावले.
———————————————————
हेही वाचा…
कौरवांसारखे विकट हास्य करत बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: माफी मागून विषय संपणार नाही; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि भाजपवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. “दुर्योधनाच्या दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना कौरव जसे विकट हास्य करत होते, अगदी तसेच विकट हास्य करत त्या 5 जणांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला. बाळासाहेब ठाकरे यांना शासकीयदृष्ट्या ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, ज्यात 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे,” अशी आग्रही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी