काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्या हातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाटल्याच्या प्रकाराचे तीव्र पडसाद गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत उमटले. शायन
.
लालबागच्या भारतमाता परिसरात आक्रमक घोषणाबाजी; महिला आघाडी रस्त्यावर
बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनाची घोषणा ठाकरे गटाने केली होती. त्यानुसार लालबाग परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात महिला आघाडीचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलक महिलांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला:
आधी मारायचे आणि मग माफी मागायची, हे खपवून घेणार नाही
बाळासाहेबांचे नाव घेऊन पुढे जाणारेच नेते त्यांचा फोटो फाडत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पुस्तक फाडताना त्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे, हे त्यांना दिसले नाही का? बाजूचे नेते दात काढून हसत होते आणि व्यासपीठावर बाळासाहेबांचा फोटो फाडला जात होता. केवळ एक माफी मागितल्याने हा विषय संपणार नाही.
प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी
बाळासाहेब ठाकरे हे आमचे पितृतुल्य दैवत असून त्यांना ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यांचा अपमान करणाऱ्या शायना एन. सी. यांनी तात्काळ प्रवक्तेपदाचा राजीनामा द्यावा आणि एकनाथ शिंदे यांनी मौन न बाळगता त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कठोर कायदेशीर कारवाईची मागणी
हा प्रकार प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारा असून, संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
शिवसेना भवन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
शायना एन. सी. यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण देताना, बाळासाहेबांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि अनावधानाने झालेल्या कृतीला राजकीय रंग दिला जात असल्याचे म्हणत माफी मागितली होती. मात्र, “तो फोटो फाडण्यासाठीच आणला होता आणि माफी ही केवळ पळवाट आहे,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. ठाकरे गटाने मुंबईभर आंदोलनाचा इशारा दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दादर येथील शिवसेना भवन परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईतील इतर भागांतही ठाकरे गटाकडून आंदोलने तीव्र केली जाण्याची शक्यता आहे.
———————————————–
हेही वाचा…
कौरवांसारखे विकट हास्य करत बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: माफी मागून विषय संपणार नाही; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि भाजपवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. “दुर्योधनाच्या दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना कौरव जसे विकट हास्य करत होते, अगदी तसेच विकट हास्य करत त्या 5 जणांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला. बाळासाहेब ठाकरे यांना शासकीयदृष्ट्या ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, ज्यात 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे,” अशी आग्रही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी