निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार
आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…