Headlines

'विराटविरुद्ध बोलण्यासाठी पैशांची ऑफर मिळाली':जर्मन मॉडेल लिजलाज म्हणाली- मला वेगवेगळ्या मासिकांमधून खूप फोन आले

जर्मन मॉडेल लिजलाजने नुकताच दावा केला की, विराट कोहलीने कथितरित्या तिचा फोटो लाईक केल्यानंतर काही पत्रकारांनी तिला क्रिकेटपटूविरुद्ध चुकीचे विधान करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती. फिल्मीमंत्राला दिलेल्या मुलाखतीत लिजलाजने सांगितले की, विराट कोहलीने कथितरित्या तिची पोस्ट लाईक केल्यानंतर तिला लोकांचे सतत फोन येऊ लागले. सर्वजण हेच सांगत होते की विराटने तिची पोस्ट लाईक केली आहे….

Read More

गोपीचंद पडळकर यांचे जयंत पाटलांवर तोंडसूख:म्हणाले – आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला याचे जयंत पाटलांना सर्वात मोठे दुःख

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विशाल पाटील खासदार व्हावे अशी जयंत पाटलांची इच्छा होती का? सगळ्या नेत्यांच्या मुलांचे लॉन्चिंग झाले. पण त्यांच्या मुलाचे झाले नाही. त्यातही त्यांना आर आर पाटलांचा मुलगा (रोहित पाटील) आमदार झाला, अजित पवारांचा पोरगा खासदार झाला याचे…

Read More

'राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते':नूमवी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विवेक सावंत यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या हस्ते नू.म. वि. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यावसायिक विठ्ठल मणियार आणि ज्येष्ठ उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनी ‘राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते’ असे मत व्यक्त केले. सावंत म्हणाले की, आयुष्याच्या वाटचालीतील विद्यार्थी दशा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात पालक आणि गुरूजनांकडून…

Read More

5 वर्षांत घरगुती वीज 26 टक्क्यांनी स्वस्त होणार:मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, CII वार्षिक परिषदेत मांडला महाराष्ट्राचा रोडमॅप

महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर’ इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, त्याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज ‘सीआयआय’च्या (CII) वार्षिक बैठकीतनंत माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्योगांसाठी आणि घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात मोठी कपात होणार असल्याची माहिती दिली. तसेच, इंधन बचतीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचा ‘रिजेक्टेड…

Read More

सोने ₹801 ने घसरून ₹1.50 लाखांवर:चांदीच्या दरात ₹300 ची घसरण, कॅरेटनुसार सोन्याचा भाव पहा

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 11 मे रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 801 रुपयांनी घसरून 1,50,277 वर आला आहे. तर, 1 किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी कमी होऊन 2,55,300 रुपयांवर आली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले- वर्षभर सोने खरेदी करू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Read More

मेफेड्रोन कारखाना सुरू करण्याच्या तयारीत तिघे जेरबंद:कुरकुंभ प्रकरणातील आरोपीची मदत घेतल्याचे उघडकीस

पुणे पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. आरोपींनी कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणात जामिनावर असलेल्या एका आरोपीची मदत घेतल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४५ लाख रुपयांचे एमडी आणि महागड्या मोटारी असा एकूण एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वाघोली परिसरात…

Read More

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी खुल्या कारागृहातून पसार:भुईंज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता

येरवडा येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कैद्याचा शोध सुरू आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील अधिकारी नागनाथ भानवसे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

BSNL च्या तारा चोरणारे नऊ परप्रांतीय अटकेत:पुणे पोलिसांकडून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त, क्रेनचा वापर

पुणे शहरात बीएसएनएलच्या भूमिगत तांब्याच्या तारा चोरणाऱ्या नऊ परप्रांतीय चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहतीतून क्रेनचा वापर करून हे चोरटे तारा काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अस्लम सगीर खान, सलमान इद्रीस मलिक (दोघे रा. दिल्ली), आरिफ कुंदनखाँ खान, शोएब हारून खान, नबी…

Read More

मोदींच्या आवाहनानंतर ज्वेलरी शेअर्स 10% नी घसरले:एक वर्ष सोने खरेदी करू नका असे आवाहन; मागणी 10% पर्यंत कमी होऊ शकते

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्यानंतर आज 11 मे रोजी ज्वेलरी कंपन्यांचे शेअर्स 10% पर्यंत घसरले. पंतप्रधान मोदींनी हैदराबादमधील एका कार्यक्रमादरम्यान नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी एक वर्षासाठी सोने खरेदी करू नये. या वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये घबराट आहे. कल्याण ज्वेलर्स आणि सेन्को गोल्डचे शेअर्स 10-10% पर्यंत घसरले. तर, देशातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपनी टायटनच्या शेअरमध्ये 7%…

Read More

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून:पुणे, कात्रजमधील आंबेगाव भागात घडली घटना

कात्रजमधील आंबेगाव भागात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. दीपक क्षीरसागर (वय ३८, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा…

Read More