अंजली दमानिया यांचाही सरकारवर निशाणा:तुम्ही विमानाने फिरायचे, ताफा मिरवायचा अन् आम्हाला इंधन वाचवण्यास सांगायचे हे चालणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधनाची काटकसर करण्याचा सल्ला देण्यापेक्षा त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून व आपल्या नेत्यांपासून करावी, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधानांच्या जनतेला काटकसर करण्याच्या आवाहनाचा समाचार घेतला आहे. पंतप्रधानांनी आपण जे बोलतो ते स्वतः करावे. तुम्ही व तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतः विमानाने फिरायचे, रॅली घ्यायच्या, गाड्यांचा ताफा मिरवायचा आणि…