Headlines

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक:जन्मलेल्या मुलीला स्वीकारण्यासही नकार; पोलिसावर गंभीर गुन्हा दाखल




लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वकिलाची फसवणूक करत तिचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी, जन्मलेल्या मुलीचा स्वीकार करण्यास नकार देत महिलेला धमकावल्याबद्दल एका पोलिस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणास्तव पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी रमेश मोहन जाधव (पोलिस हवालदार, बक्कल क्र. 561, सध्या नियुक्ती – खडकी, पुणे; मूळ रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांत दाखल झालेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव याच्याविरुद्ध 27 जुलै 2026 रोजी गु. र. क्र. 297/2026 अन्वये, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 69, 81, 351(2), 351(3) आणि 318 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. न्यायालयीन कामकाजादरम्यान झाली ओळख फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पीडित महिला व्यवसायाने वकील असून, 2024 मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली होती. सुरुवातीला केवळ कामापुरता मर्यादित असलेला हा संवाद पुढे मोबाईल, मेसेज आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमधून वाढत गेला. याच दरम्यान, आपले पहिले लग्न मोडले असून पत्नीपासून आपण अनेक वर्षांपासून विभक्त राहत असल्याचे सांगत, आरोपीने पीडित महिलेशी कायदेशीर विवाह करण्याचे वारंवार आश्वासन दिले. पीडितेकडून 40 हजार रुपये उकळले “तूच माझी होणारी पत्नी आहेस” आणि “आयुष्यभर मी तुझी साथ सोडणार नाही”, अशा भूलथापा देऊन आरोपीने महिलेचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वतःला आर्थिक अडचण असल्याचे कारण पुढे करत त्याने पीडितेकडून 40 हजार रुपये उकळले. एवढेच नव्हे तर, त्याच दिवशी तिला बारामती येथील एका लॉजवर नेऊन, विवाहाचे पुन्हा खोटे आश्वासन दिले आणि फसवणूक करत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. सोबत राहून पीडितेला गर्भवती केले दरम्यान, लॉजवरील घटनेनंतर आरोपीने आपल्या नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केल्याने, त्याचे आश्वासन खरे असल्याचा फिर्यादीचा विश्वास अधिकच दृढ झाला. काही दिवसांनी, एका मंदिरात आरोपीने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची साखळी फिर्यादीच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून घातली आणि “आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस” असे तिला सांगितले. यानंतर, जेऊर व निंभोरे परिसरात पत्नी म्हणूनच तिची ओळख करून देत, काही काळ त्याने तिच्यासोबत सहजीवन व्यतीत केले. याच काळात फिर्यादी महिला गर्भवती राहिली, मात्र त्यानंतर आरोपीच्या वागणुकीत अचानक मोठा बदल झाला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्याने तिची कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. उलट, वारंवार संशय घेऊन वाद घालणे, मानसिक त्रास देणे, उपचारासाठी मदत न करणे आणि गर्भधारणेच्या काळात तिला पूर्णपणे एकटे सोडणे, अशी अत्यंत क्रूर वागणूक त्याने दिली. मुलीच्या जन्मानंतर आरोपीने केला अस्वीकार पुढे, 20 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादीने एका मुलीस जन्म दिला. ही मुलगी आरोपीपासूनच झाली असून, तोच तिचा जैविक पिता असल्याचा ठाम दावा फिर्यादीने केला आहे. मात्र, मुलीच्या जन्मानंतरही आरोपीने तिला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर, त्याने एकदाही मुलीची भेट घेतली नसल्याचेही फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *