गायीचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी:बी. चंद्रकांत रेड्डी
प्रतिनिधी | अकोला उमरीतील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेतील गोरक्षणमध्ये गोमाता सन्मान दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पार पडला. यानिमित्ताने रॅलीही काढण्यात आली. गाय ही कामधेनू आहे. गाय वाचवणे व गाईचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी म्हणाले. माजी…