निकृष्ट सोयाबीनसह मोशी दुर्घटनेवरून सरकारला काँग्रेसचा घेराव:विजय वडेट्टीवारांची स्थगन प्रस्तावातून कारवाईची मागणी, कृषिमंत्र्यांची दोषी कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची ग्वाही
राज्यातील निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीच्या मुद्द्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारला घेरले. दोन्ही प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकरी संकटात विदर्भातील अकोला, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये निकृष्ट आणि बोगस…