Headlines

25 राज्यांतील शेतकरी संघटनांचा ‘सिफा’ला एकमुखी पाठिंबा:सर्वोच्च न्यायालयातील कृषी नीतीच्या कायदेशीर लढ्याला देशव्यापी बळ देण्याचा केला संकल्प‎

कन्सोर्टियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन्स अर्थात ‘सिफा’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी समिती व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक कापूसनगरी अकोला येथे पार पडली. या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील विविध राज्यांतून आलेले प्रमुख शेतकरी नेते, कृषी तज्ज्ञ . या अधिवेशनात जेव्हा देशभरातून आलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी आपण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेला एकमुखी…

Read More

एक धमकी आली तर घाम फुटला,तुम्ही स्वतःला भगतसिंग समजता का?:प्रसाद लाड यांच्या धमकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात!

भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटले आहे. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकते. संजय राऊत म्हणाले…

Read More

घरोघरी जिजाऊ घडल्याशिवाय "शिवबा' घडणार नाहीत:पिचडगावच्या सुदर्शन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका अंजना सोनवणे यांचे आवाहन‎

प्रतिनिधी | नेवासे फाटा आजच्या काळात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या मुलांना जिजाऊ माँसाहेबांसारखे ज्ञान व संस्कार देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षिका अंजना सोनवणे यांनी केले. नेवासे तालुक्यातील पिचडगाव येथील सुदर्शन न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सोनवणे म्हणाल्या, अखंड…

Read More

MBBS चे 2 विद्यार्थी ग्वाल्हेरच्या तिघरा धरणात बुडाले:एक मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू; प्रतिबंधित क्षेत्रात पिकनिकसाठी गेले होते

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील गजराराजा मेडिकल कॉलेज (GRMC) च्या एमबीबीएस द्वितीय वर्षाचे दोन विद्यार्थी शनिवारी संध्याकाळी तिघरा धरणात बुडाले. दोन्ही मित्रांचा पाय घसरल्याने ते 40-50 फूट खोल पाण्यात बुडाले. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी 7 वाजता धरणाच्या कच्ची पार परिसरात घडली. येथे सामान्य नागरिकांच्या ये-जा करण्यास बंदी आहे. बचाव पथकाने रात्री उशिरा गोपाल अग्रवाल यांचा मृतदेह…

Read More

परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात 4 आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ:जप्त हार्डडिस्क, लॅपटॉपमधील डेटाचे विश्लेषण

परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या आठपैकी चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अहफाज खान मन्सूर खानची २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवण्यात आली तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी हार्ड डिस्क आणि लॅपटॉप जप्त केला होता. त्यामधील डेटा विश्लेषण करणे अद्याप बाकी आहे….

Read More

सेवापूर्ती सोहळ्यात 5 एकल मुलांचे स्वीकारले पालकत्व

डॉ. संजय कळमकर हे कथा, कादंबरी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते जरी आज गटशिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त होत असले, तरी त्यांनी आता शासकीय सेवेतून निवृत्त होऊन माझ्यासोबत पूर्णवेळ काम केले पाहिजे. त्यांच्यासारख्या प्रगल्भ लोकांची आज समाजाला मोठी गरज आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. डॉ. कळमकर यांच्या सेवापूर्ती…

Read More

आळेफाटा परिसरातून गावरान जांभळाची झाडे झाली गायब:झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला

आळेफाटा | उन्हाळा सुरू झाला की गावोगावी रस्त्यांच्या कडेला आणि शिवारात काळ्याभोर गावरान जांभळांनी लगडलेली झाडे अन् त्याखाली शाळकरी मुलांची होणारी गर्दी… हे सुखावणारं चित्र आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकरण, शेतीचा विस्तार आणि रस्ते रुंदीकरणात झालेली बेसुमार वृक्षतोड यांमुळे आळेफाटा परिसरातून जांभळाची जुनी झाडे झपाट्याने नष्ट झाली आहेत. नव्या लागवडीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आता गावरान…

Read More

अमरावतीतील सुरेश भट स्मारक, गजल गुरुकुलला सरकारची अनुकूलता:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने अमरावतीत स्मारक आणि जिल्ह्यात गजल गुरुकुल स्थापन करण्यासाठी सरकार अनुकूल असून त्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अमरावतीचे भूमीपुत्र गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्र्यांनी ही घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या स्थापना कार्यक्रमात हा सत्कार आयोजित…

Read More

तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगात 80% रुग्ण व्यसनी:बीडी, माथाडी कामगारांसाठी दंतवैद्यक सरसावले, मोफत मौखिक तपासणी‎

३१ मे रोजी जगभरात पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक तंबाखूमुक्त दिना’चे औचित्य साधून इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेच्या वतीने शहरात तंबाखूविरोधी व्यापक जनजागृती मोहीम आणि मौखिक कर्करोग (तोंडाचा कॅन्सर) तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. देशातील सुमारे ३० टक्के कर्करोग हे तोंडाशी संबंधित असून, तोंडाच्या कर्करोगाच्या जवळपास ८० टक्के रुग्णांमध्ये तंबाखू सेवन हेच मुख्य कारण असल्याचे संशोधनातून समोर…

Read More

डिझेलअभावी ट्रॅक्टरची चाके थांबली:३५० पंपांवर ‘नो स्टॉक''चे फलक, कॅन घेऊन शेतकऱ्यांचा पंपावर मुक्काम‎

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून इंधन टंचाईचे संकट असून ग्रामीण भागात ऐन खरिपाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टरची चाके शेतातच थांबली आहेत. रोटाव्हेटर आणि नांगरणीची कामे करण्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी बळीराजा आता शेत सोडून पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगेत उभा आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जवळपास ३५० हून अधिक…

Read More