उन्हामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाबसला फटका; लागवड आली धोक्यात:पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद परिसरातील चित्र
प्रतिनिधी |पिंपळदरी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिल्लोड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकरी उन्हाळी मिरची लागवड करत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरची लागवड धोक्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील, पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई,…