Headlines

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती:तिवसा प्रकल्पाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट‎

स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावासुद्धा घेतला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचे, स्वच्छतेचे तसेच सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा वि द्यार्थ्यांसाठी अभ्यासदौऱ्याचे केंद्र बनू शकतो, या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना…

Read More

आंदोलनाच्या इशाऱ्यापूर्वी मनोज जरांगेंची कुणीतरी भेट घेतली:भाजप नेते प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट; पाटलांना भेटणारा व्यक्ती कोण?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली असली, तरी या घोषणेमागे मोठा राजकीय पूर्वग्रह आणि पडद्यामागच्या हालचाली असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. “जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी त्यांची कुणीतरी गुप्त भेट घेतली होती आणि त्यानंतरच हे उपोषण जाहीर झाले,”…

Read More

राजकारण तापले:राज्यामध्ये अमराठी रिक्षाचालकांना साहित्यिक देणार आता मराठीचे धडे, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य

महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. १ मेपासून रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर आणि ई-बाइक चालवणाऱ्या अमराठी चालकांना आता प्रवाशांशी मराठीतच संवाद साधावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही भाषा शिकवण्यासाठी राज्यातील दिग्गज साहित्यिक आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच चालकांसाठी खास मराठी कार्यशाळा सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली….

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश-देवी शारदा विवाह सोहळा:गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार 'शारदेश मंगलम्' उत्साहात संपन्न

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला….

Read More

जामनेरातील फर्निचर दुकानाला रात्री आग‎:जामनेरातील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलातील घटना; रात्री उशिरा आगीवर मिळवले नियंत्रण

शहरातील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलात असलेल्या एका फॉर्म अँड फर्निचरच्या दुकानाला गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजे दरम्यान लागली. या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. . आकाश शार्दुल यांचे येथील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलात घरातील सजावटीसाठी लागणारे पडदे, फोनच्या गाद्या, फायबर दरवाजे, फेविकॉल, टेस्टिंग साठी लागणारे केमिकल अशा साहित्याचे दुकान आहे….

Read More

लाखमोलाच्या केळी बागांना तीव्र‎उष्णतेपासून वाचवण्यासाठी धडपड‎:बागेच्या चहूबाजूंनी ग्रीननेट, साड्या लावून उष्ण वाऱ्यांना करतात अटकाव

तांदलवाडी परिसरात केळी हे मुख्य पीक आहे. त्यामुळे वर्षभर निर्यातक्षम उत्पादनावर शेतकऱ्यांवर भर असतो. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढून तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे केळीचे पीक जोपासताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. उष्णतेचा कापणी . तापमान वाढीमुळे केळी झाडाची पाने कोरडी पडणे, घड निसटणे, पाने करपणे, प्रखर सूर्यकिरणांमुळे घड खराब होऊन काळे पडणे, पिकाची वाढ…

Read More

पाऊस लांबल्याने फुलंब्री तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात:तालुक्यात केवळ 18 हेक्टरवरच कपाशीची लागवड‎

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागडे बियाणे खरेदी करून, उन्हाचा चटका सोसत भाजीपाल्याची लागवड करायची आणि पुढे बाजारात चांगला भाव मिळवून सुगीचे दिवस पाहायचे, या आशेने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी दरवर्षी भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, यावर्षी पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचा हा अंदाज पूर्णपणे अंगलट आला असून तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी भीषण संकटात…

Read More

ममता बॅनर्जींचे 'थर्ड डिग्री' राजकारण संपले:आता बंगालमध्ये सुशासन येणार, महाराष्ट्रातील विरोधकांनीसुद्धा धडा घ्यावा- चंद्रशेखर बावनकुळे

बंगालमध्ये अनेक दिवसांचा संघर्ष आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. संघ परिवार, भाजप आणि बुथ मॅनजमेंट आणि ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मेहनत घेतली. बंगालमध्ये दृष्ट शासन जात तिथे सुशासन आले पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या परिवारासोबत…

Read More

ममता बॅनर्जी भवानीपूर स्ट्रॉंग रूममध्ये 4 तास थांबल्या:म्हटले – कोणालाही EVM लुटू देणार नाही; EC म्हणाले- पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, EVM सुरक्षित

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मध्यरात्री 1 वाजता सांगितले, ‘जर EVM लुटण्याचा आणि मतमोजणीत फेरफार करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू.’ त्या भवानीपूर येथील शेखावत मेमोरियल स्कूलमधील स्ट्रॉंग रूममध्ये 4 तासांपेक्षा जास्त काळ थांबल्या. खरं तर, टीएमसीने आरोप केला की भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करत आहेत….

Read More

सातारा जिल्ह्यातही 'कॉक्रोच जनता पार्टी'ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित केले प्रश्न

देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील श्री धुळोबा मंदीरात आज पार पडलेल्या धुळदेव ग्रामपंचायतिच्या ग्रामसभेत सचिन शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पोस्टर लावत ग्रामसभेत आक्रमकपणे विविध प्रश्न उपस्थित केले. भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी…

Read More