Headlines

Fraudster Manohar Bhosale in Police Custody; Photos with Devendra Fadnavis, Nitin Gadkari, Nana Patole Viral

व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू मनोहर भोसले याची न्यायालयाने 3 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. यामुळे स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या या भोंदूचा पाय खोलात गेल्याचा दावा केला जात आहे . सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी एका प्रकरणात सोलापूरच्या कुर्डूवाडी येथून भोंदू मनोहर भोसले व त्याचा सहकारी विशाल वाघमारे या दोघांना…

Read More

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संतापजनक प्रकार:दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट; संबंधितांवर कारवाईची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. यामुळे धार्मिक स्थळी अशा वस्तू आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे….

Read More

आशा भोसलेंनी निधनाच्या एक दिवस आधी नाटक पाहिले:लोकांना फटकारत कला जिवंत ठेवण्याबद्दल बोलल्या होत्या

गायिका आशा भोसले त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी मुंबईत तीन तासांचे मराठी नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्या रंगमंचावरही गेल्या आणि नाटक पाहण्यासाठी आलेल्या लोकांना फटकारत कला जिवंत ठेवण्याबद्दल बोलल्या होत्या. ही गोष्ट आशा भोसले यांचे नातू चिंटू भोसले यांनी स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी 92 व्या वर्षी निधन झाले…

Read More

अधिकाऱ्याची दुचाकीवर जाऊन एमपी- महाराष्ट्र सीमेवरील वाळू घाटावर धाड:पोकलॅन्डसह दोन वाहन केली जप्त; कठोर कारवाईचे संकेत‎

वाळूतस्करांना कारवाईची कुणकुण लागू नये म्हणून धारणी येथे कार्यरत असलेले प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी थेट दुचाकीवर स्वार होऊन वाळू घाट गाठला. यावेळी त्यांच्यासोबत केवळ तीन महसूल कर्मचारी होते. आयएएस शुक्ला यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील सोनाबर्डी गावानजीक तापी नदीत सुरू असलेल्या वाळू घाटावर गुरूवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता धाड…

Read More

आता AI आणि प्रीमियम कॅमेऱ्यावर फोकस:ओप्पो इंडिया कम्युनिकेशन हेड म्हणाले- लोक महागडे फोन घेताहेत, ₹80000+ सेगमेंटमध्ये 37% वाढ

ओप्पोच्या भारतात 11 वर्षांच्या प्रवासात आणि 10 कोटींहून अधिक ग्राहकांच्या विश्वासासह, कंपनी आता आपली रणनीती बदलत आहे. शेवटी, लोक आता स्वस्त फोनऐवजी प्रीमियम आणि महागडे फोन का पसंत करत आहेत? आणि येत्या काळात मोबाईलच्या किमती कमी होतील का? या सर्व प्रश्नांवर ओप्पो इंडिया कम्युनिकेशन हेड गोल्डी पटनायक यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. मुलाखतीचे मुख्य अंश वाचा……

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:कोडोली येथे बहिणीच्या घरी भावाची चोरी; अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा शहराजवळील कोडोली परिसरात बहिणीच्या घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बहिणीने स्वत:च्या भावाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून दि. २३ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपीने फिर्यादीच्या बॅगेतून घराची…

Read More

यापुढे बाबासाहेबांचे नाव कधीही घेऊ नका:माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना श्याम मानव यांचा सल्ला; धीरेंद्र शास्त्रींच्या भेटीवरून केली टीका

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश येथील छातरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला सहकुटुंब भेट दिली होती. तसेच त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत अर्धा तास चर्चा देखील केल्याची माहिती समोर आली होती. तसेच या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून भूषण गवई यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई:बेकायदेशीर पिस्टलसह 20 वर्षीय तरुण जेरबंद, 65 हजारांचा मुद्देमालही हस्तगत

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. आरोपीकडून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हर्षद सुनील भोसले (वय 20, रा. आझाद नगर, मोळाचा ओढा, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात…

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी आता FD आणखी फायदेशीर:स्मॉल फायनान्स बँक देत आहे सर्वाधिक परतावा; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या यासंबंधीच्या खास गोष्टी

शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान सुरक्षित गुंतवणुकीची इच्छा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव (FD) पुन्हा एकदा सर्वात पसंतीचा पर्याय म्हणून उदयास आली आहे. 2026 मध्ये निवृत्तीनंतर आपल्या भांडवलाची सुरक्षा आणि नियमित उत्पन्नाला प्राधान्य देणाऱ्या वृद्धांसाठी एफडीवर उत्कृष्ट परतावा मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सामान्यतः सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% (50 बेसिस पॉइंट्स) जास्त व्याज मिळते. व्याजाचे हे…

Read More

“एल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात 15 दिवस होणार वाढ:काळजी घ्यावी, पाऊसही पडणार कमी; हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांची माहिती‎

“एल निनो’च्या प्रभावामुळे दि. १० मेपर्यंत शहरासह महाराष्ट्रातील तापमान वाढत जाणार असून, त्यानंतर तापमान हळूहळू कमी होणार आहे. तसेच आणि यंदा शहरात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडेल, असा अंदाज येथील हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांनी वर् . “एल निनो’ला दि. २५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. “एल निनो’च्या काळात दररोज तापमात काही प्रमाणात…

Read More