Headlines

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संतापजनक प्रकार:दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट; संबंधितांवर कारवाईची मागणी




सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. यामुळे धार्मिक स्थळी अशा वस्तू आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दररोज हजारो भाविकांची मांदियाळी असणाऱ्या या सात मजली दर्शन मंडपात सध्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, येथील स्वच्छतेची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे असूनही अस्वच्छतेच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मंदिर प्रशासनाने स्वच्छतेचा कंत्राट देऊनही व्यवस्थापनात निर्माण झालेल्या या त्रुटींमुळे भाविकांमधून संताप व्यक्त होत असून, या गंभीर हलगर्जीपणाबद्दल आता संबंधित यंत्रणेला जाब विचारला जात आहे. मंदिरासारख्या अत्यंत पवित्र ठिकाणी दारू आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने खळबळ उडाली असून, या निंदनीय प्रकारामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील गंभीर निष्काळजीपणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसाट यांनी केली असून, दर्शन मंडपातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संतापजनक घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, धार्मिक स्थळांचे पावित्र्य धोक्यात आल्याने जनमानसात मोठी नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मंदिराची पवित्रता राखण्यासाठी तातडीने कठोर आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आता सर्वसामान्य भाविकांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *