Headlines

“एल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात 15 दिवस होणार वाढ:काळजी घ्यावी, पाऊसही पडणार कमी; हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांची माहिती‎



“एल निनो’च्या प्रभावामुळे दि. १० मेपर्यंत शहरासह महाराष्ट्रातील तापमान वाढत जाणार असून, त्यानंतर तापमान हळूहळू कमी होणार आहे. तसेच आणि यंदा शहरात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडेल, असा अंदाज येथील हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांनी वर्

.

“एल निनो’ला दि. २५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. “एल निनो’च्या काळात दररोज तापमात काही प्रमाणात वाढ होत जाणार आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस म्हणजे दि. १० मेपर्यंत शहरातील नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. हे वाढते तापमान नागरिकांसोबतच पशू – पक्ष्यांसाठीही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. शहरात दरवर्षी साधारणत: ३२ इंच पाऊस पडत असतो. मात्र, यंदा “एल निनो’च्या प्रभावामुळे २६ इंच पाऊस पडण्याची शक्यता पारेख यांनी वर्तवली आहे.

“एल निनो’च्या काळात सूर्याची किरणे तिरपी पडतात, त्यामुळे उष्णतेत वाढ होते. खऱ्या अर्थाने तापमानात वाढ दुपारी १ ते ४ या वेळेत होते. त्यानंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत जातो, अशी माहिती पारेख यांनी दिली आहे.

शासकीय स्तरावर तापमापक यंत्र नाही विदर्भातील सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहरात शासकीय स्तरावर शहराचे तापमान मोजण्याची सुविधा उपलब्ध नाही. हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख सन् १९७३ पासून उन्हाळ्यातील चार महिन्यांतील दररोजच्या तापमानाची नोंद ठेवतात. असे असले तरी त्यांच्या तापमान नोंदींना शासकीय स्तरावर अधिकृत मानले जात नाही. त्यामुळे शहरातील तापमानाची अधिकृत माहिती मिळण्यासाठी शासकीय स्तरावर उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात तापमान मापक यंत्र बसवावे. रोज तापमानाची नोंद करावी. तसेच त्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *