प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:अलिबागमधून आणखी 2 आरोपींना बेड्या; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळले, पत्रकार परिषदेकडे लक्ष
मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या हत्येतील आणखी दोन मुख्य आरोपिंना पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावरील अलिबागजवळ एका डेअरीतून बेड्या ठोकल्या आहेत. निखिल यादव आणि नितेश पवार अशी या अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहे. या प्रकरणातील अटक…