Headlines

‘एमपीएससी’ने अपात्र उमेदवारांची प्राध्यापक म्हणून केली नियुक्ती:कला संचालनालय भरती प्रक्रिया वादात; संभाजीनगर मॅटची नोटीस

एमपीएससीच्या भरती प्रक्रियेतील एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. कला संचालनालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी चक्क ‘फिटनेस क्लब’चे अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवाराची निवड केली आहे. या गंभीर अनियमिततेची दखल मॅटने घेतली आहे. कला संचालनालयांतर्गत ७९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. नियमानुसार उमेदवारांकडे दोन वर्षांचा शैक्षणिक अनुभव असणे अनिवार्य होते. मात्र, सुरुवातीला…

Read More

मनमाडमध्ये टर्फसाठी भाडेकरारास वंचित बहुजन आघाडीकडून विरोध:नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत ठराव रद्द करण्याची मागणी‎

मनमाड नगरपालिकेने आययूडीपी विभागातील जागा टर्फसाठी भाडेकराराने देण्याचा घेतलेला निर्णय जनहितविरोधी असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी शहर शाखेतर्फे बुधवारी सकाळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नगरपरिषद हद्दीतील आययूडीपी साईट क्रमांक १८ मधील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच सार्वजनिक उद्यानासाठी राखीव ठेवण्याऐवजी ती खासगी वापरासाठी…

Read More

तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली:गळ्याजवळ चावा घेत 'लव्ह बाईट' दिला, नाशिकमधील आणखी एक धक्कादायक प्रकरण

नाशिकमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशोक खरातनंतर टीसीएस कंपनीमधला लव्ह जिहाद प्रकरण, या नंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,…

Read More

हिंगोलीत अवैध वाळू वाहतूक:10.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परसह १०.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर मंगळवारी ता. ३० हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा,…

Read More

मेळाव्यात कौटुंबिक समस्या निवारण्यावर मंथन:पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्राच्या पुढाकाराने आयाेजन‎

पाटील समाज अकोला अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्रातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. मोठ्या उमरी परिसरातील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या यात मेळाव्यात कौटुंबिक समस्या न . मेळाव्यात अध्यक्षस्थानी उमरीचे माजी सरपंच तथा ओम साई बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बळीराम कपले होते. प्रमुख…

Read More

सेंद्रीय, नैसर्गिक शेती करणाऱ्या 20 शेतकऱ्यांवर कौतुकाची थाप:कृषी दिनानिमित्त कृषी विभागाकडून सन्मान, जिल्हा परिषदेत कार्यक्रम‎

नैसर्गिक व सेंद्रीय पद्धतीने शेती करुनसुद्धा कधीही तोटा न होऊ देणाऱ्या जिल्ह्यातील २० गुणी शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे,…

Read More

एमपी-यूपी आणि राजस्थानमध्ये तापमान 40°C वर पोहोचले, उष्णतेच्या लाटेचा इशारा:दिल्ली-पंजाबमध्ये 40 किमी प्रतितास वेगाने धुळीचे वादळ येईल, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बर्फवृष्टी

गेल्या 15 दिवसांपासून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तीव्र उष्णतेला ब्रेक लागला होता, पण आता उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात तापमान वाढू लागले आहे. हवामान विभागाच्या मते, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, सौराष्ट्र कच्छ, बिहार आणि झारखंडमध्ये या आठवड्यात पारा 40°C च्या पुढे जाईल. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये आज धुळीच्या…

Read More

देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला?:तुमच्या हव्यासापोटी निर्माण वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र 'उडता पंजाब' झालाय – राजू शेट्टी

“सत्ता आणि हव्यासापोटी निर्माण झालेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होऊन ‘उडता पंजाब’ झाला आहे, हे आता मान्य करा. राज्यात अवैध धंद्यांचा महापूर आला असून गल्लीबोळातील बेकायदा व्यवसायांची यादीच मी तुम्हाला पाठवू शकतो,” अशा जळजळीत शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांवर गंभीर आरोप…

Read More