पालघर हादरले:अनधिकृत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 4 महिला गंभीर; वाडा येथील घटना
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे एका अनधिकृत फटाका कारखान्यात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (२५) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, चार महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या मृत्यूच्या कारखान्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे….