Headlines

Mumbai Protest Viral Video Controversy; Opposition Demands Police Action


दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दादरमधील आंदोलनावेळी एका विद्यार्थिनीला पकडताना सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचाऱ

.

नेमका प्रकार काय?

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद सध्या महाराष्ट्रातही उमटत आहेत. मुंबईतही विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. या आंदोलनांना पांगवताना पोलिसांकडून बळाचा वापर होत असल्याचे व्हिडिओ याआधीही समोर आले आहेत. मात्र, दादर येथील एका आंदोलनाचा नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. या व्हिडिओमध्ये एक साध्या वेशातला पोलिस कर्मचारी एका तरुण महिला आंदोलकाला विचित्र पद्धतीने खेचताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. मात्र तो कोण आहे याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

हा नराधम कोण? थेट गजाआड करा- रोहित पवार

या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी एक्सवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “हा व्हिडिओ पाहून माझ्या डोक्याची तिडीक उठली आहे. स्वतःच्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत इतके किळसवाणे कृत्य करणारा हा नराधम नेमका कोण आहे? जर हा खरोखर पोलीस असेल, तर त्याला केवळ निलंबित करू नका, तर पोलीस दलातून थेट बडतर्फ करा. त्याच्यावर तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करा.” महाराष्ट्र पोलीस दलाला एक मोठी आणि सन्मानजनक परंपरा लाभली असून, असे अधिकारी या प्रतिष्ठेला लागलेली ‘कीड’ आहेत, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड आणि जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही हा व्हिडिओ शेअर करत पोलिसांच्या पद्धतीवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. “पोलीस अशा अमानुष आणि लज्जास्पद पद्धतीने कारवाई करू शकतात का?” असा प्रश्न विचारत त्यांनी या पोलिसाच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.

दुसरीकडे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पोलिसांचा हा अतिरेक आता सरकारच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही, यांना वेळीच आवरा,” असा सज्जड इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कारवाईकडे लक्ष

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित घटनेची चौकशी होणार का आणि पोलिस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा..

इकडे पुन्हा आल्यास ड्रग्ज टाकून आत टाकेन…:तरुणांना धमकावणाऱ्या पोलिसाचा VIDEO काँग्रेसकडून ट्विट, राज ठाकरेंच्या टिकेनंतर थेट कारवाई

तरुणांना खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्हांमध्ये अडकवण्याची धमकी देणारा प्रकार काँग्रेसने समोर आणला आहे. त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी पोस्ट केलाय. मुंबई काँग्रेसनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तरुणांना इकडे पुन्हा आल्यास खिशात ड्रग्ज टाकून आत टाकेन, अशी धमकी एक पोलिस अधिकारी देताना दिसतोय. सविस्तर वाचा

सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण सोडले: मंत्री नड्डा मध्यरात्री 12.30 वा. मेदांतात, ज्यूस पाजला; CJP समर्थकांनी बॅरिकेड्स तोडले, आंदोलन सुरूच

पेपरफुटीविरोधात उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी २७ व्या दिवशी उपोषण सोडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी वांगचुक यांना सरबत पाजून त्यांचे उपोषण सोडवले. वांगचुक यांनी उपोषण संपवल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा

रोहित पवारांचा पोलिसांच्या भूमिकेवर संताप:म्हणाले- अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR ची हिंमत दाखवली नाही, अन् विद्यार्थ्यांवर कारवाई?

नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राज्यभरात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत पोलिसांच्या कारवाईला ‘दिल्लीच्या पोलिसांपेक्षाही क्रूर’ म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा ही दडपशाही सरकारच्या अंगलट येईल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.