Headlines

Vanita Kharat, Priyadarshini Indalkar Support NEET Protest in Mumbai


नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता मराठी कलाविश्वातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी मुंबईतील दादर येथील आ

.

दादरच्या आंदोलनात अभिनेत्रींची हजेरी

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आवाहनानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. राजकीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींपाठोपाठ आता मराठी कलाकारही या सामाजिक लढ्यात हिरीरीने सहभागी होत आहेत. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या निदर्शनांमध्ये वनिता खरात आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी हातात भारताचे संविधान घेऊन विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. या आंदोलनातील त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

विद्यार्थ्यांचा आवाज दाबून नव्हे, तर ऐकून राष्ट्र घडतं…

वनिता खरातने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आंदोलनाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, “काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यात मी सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. कारण आजचा हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या अपार मेहनतीचा, विश्वासाचा आणि पर्यायाने देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आहे.”

संविधानाचा दाखला देत तिने पुढे लिहिले आहे की, “लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणे हा कोणताही गुन्हा नाही, तर तो संविधानाने दिलेला प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही, तर त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडते.” तिने सर्वांना या न्यायाच्या लढ्यात साथ देण्याचे आवाहन केले आहे.

‘हास्यजत्रा’च्या टीमचा जाहीर पाठिंबा

वनिताच्या या परखड आणि थेट पोस्टवर सध्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, वनिता खरात आणि प्रियदर्शनी यांच्या प्रत्यक्ष सहभागापूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनीही सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत या विद्यार्थी आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला होता.

संबंधित वाचा..

आपण माणसं राहिलो नाही, झोंबी झालो आहोत: विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर अभिनेता समीर चौघुले संतापले, ट्रोलर्सनाही सुनावलं

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर भावनिक आणि संतप्त पोस्ट लिहित विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली आहे. तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत त्यांनी समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेवरही बोट ठेवले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.