व्यसनाचे केंद्र बनत आहे ईशान्येकडील राज्य मिझोरम:म्यानमारमधून नशेचे थेट घरपोच वितरण, 3 वर्षांत सुमारे 4000 किलो ड्रग्ज जप्त
रात्रीचे साधारण साडेअकरा वाजले आहेत. मिझोरमची राजधानी आयझॉलमध्ये पारा घसरत आहे आणि रस्ते जवळजवळ निर्मनुष्य आहेत. पण, या शांततेत साधे कपडे घातलेले काही तरुण हातात टॉर्च आणि लाकडी काठ्या घेऊन दिसले. विचारल्यावर कळले की हे पोलीस नसून, ‘यंग मिझो असोसिएशन’ (YMA) चे स्वयंसेवक आहेत, जे राज्यात पसरत असलेल्या म्यानमारच्या ‘आईस’ नावाच्या सिंथेटिक ड्रग्जपासून पुढच्या पिढीला…