Headlines

युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे:धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये डॉ. साळुंके यांचे आवाहन‎

देशाचे भवितव्य असलेल्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा, कौशल्ये, क्षमता राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे नाशिक जिल्हा संघटक तथा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. जिल्हा समाजकल्याण कार्यालय नाशिक, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई) आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चा शुभारंभ धोडंबे…

Read More

एनडीआरएफची महाराष्ट्र-गोव्यात पथके तैनात:मान्सूनसाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 5 बटालियनची पूर्वतयारी

मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्वरित व प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी 5 बटालियन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांनी 1 जुलै 2026 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपल्या पथकांची पूर्वतैनाती केली आहे. ही तैनाती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , महाराष्ट्र तसेच एनडीआरएफ मुख्यालय यांच्या समन्वयाने सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, रायगड,…

Read More

‘गोविंदा… गोविंदा…’च्या जयघोषात महाआरती‎:लासलगावला श्री बालाजींना आंब्याच्या रसाचा ज्येष्ठाभिषेक

लासलगाव येथील श्री बालाजी मंदिरात शुक्रवारी (दि. २६) पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठाभिषेक (आंबाभिषेक) सोहळा भक्तिभावात पार पडला. श्री बालाजी भगवानांना आंब्याच्या रसाने विशेष अभिषेक करण्यात आला. आकर्षक फुलांची सजावट, धार्मिक विधी आणि मंगलमय वातावरणामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या अभिषेक सोहळ्यास लासलगाव व परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा…

Read More

उमरडच्या शिबिरात 800 प्रमाणपत्रांचे वाटप:महसूल विभागाच्या समाधान शिबिरामध्ये अनेक प्रलंबित दाखल्यांचा निपटारा‎

वाशिंबे करमाळा तालुक्यातील उमरड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित ‘समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आपली रेंगाळलेली प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन केले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन बदे, आदिनाथचे संचालक राजाभाऊ…

Read More

9 वर्षांपासून रखडला पालखी मार्ग; 24 मीटरवरून आला 18 मीटरवर:पैठण ते पंढरपूर मार्गाची दयनीय अवस्था; वारकऱ्यांना खडतर प्रवासाची शिक्षा‎

मराठवाड्याच्या संतपरंपरेचा मानबिंदू असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाचे काम तब्बल नऊ वर्षांपासून रखडले आहे. काही ठिकाणी भूसंपादन न झाल्याने आणि शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने प्रकल्प संथगतीने सुरू असला तरीही या रस्त्याची रुंदी आता २४ मीटरवरून १८ मीटर करण्यात आली आहे. त्यातदेखील रस्ता सोलापूर जिल्हा वगळता सर्व ठिकाणी रखडला असल्याचे नाथवंशज पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले…

Read More

विषारी दारू प्रकरणातील मृतांचा खरा आकडा समोर आणा:डॉ. नीलम गोऱ्हे यांची CIDकडे मागणी, व्यापक तपासाची गरज असल्याचे मत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात मृत्यूंचा आणि बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. डॉ. गोऱ्हे यांनी सीआयडीचे अप्पर…

Read More

RTO विभागात मोठ्या रॅकेटचा आरोप:विजय वडेट्टीवारांच्या मागणीनंतर SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीर वसुलीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, जे इमानदार अधिकारी या वसुलीला साथ देत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकवले जाते, असा अत्यंत खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या आरोपांसोबतच त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे आणि ऑडिओ क्लिप्स सभागृहात सादर केल्याने एकच खळबळ…

Read More

मोझरी- डवरगाव मार्गावर नियम धाब्यावर:डांबरी रस्ताच फोडला, चार ठिकाणी खोदकाम : वाहनचालकांचे जीव धोक्यात‎

गुरुकुंज मोझरी ते डवरगाव या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्यावर चार ठिकाणी रस्ता फोडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे खुलेआम नुकसान होत आहे. हे काम कोण करत आहे, त्याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर शेती, वीटभट्ट्या तसेच एमआयडीसी परिसर आहे. त्यामुळे औद्योगिक…

Read More

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More

PM मोदींनी हुगळी नदीत बोटीतून प्रवास केला:नाव चालकाला मिठी मारली, ₹1000 दिले; 5 दिवसांपूर्वी झालमुडी खाल्ली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हुगळी नदीत नौकाविहार केला. यावेळी पंतप्रधानांनी स्वतः छायाचित्रणही केले. छायाचित्रांमध्ये ते हातात कॅमेरा घेऊन दिसत आहेत. त्यांनी नाव चालकाशी संवादही साधला. गंगेत नौकाविहार घडवणाऱ्या नाव चालकाला त्यांनी एक हजार रुपयेही दिले. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नौकाविहाराची छायाचित्रे शेअर केली. त्यांनी लिहिले, ‘प्रत्येक बंगालीसाठी गंगेचे एक खूप खास स्थान…

Read More