Headlines

पुण्यात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन:उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले- शिवसेना सामान्यांच्या सेवेसाठी तत्पर

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सामंत यांनी सांगितले की, शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सारसबागेजवळील शिवसेना भवनात हा कक्ष सुरू झाला….

Read More

रणवीर सिंगला सुनील शेट्टीचे समर्थन:म्हटले- तुम्ही कोण कोणालाही बंदी घालणारे, हा अधिकार कोणालाही नाही; जाणून घ्या काय आहे प्रकरण

डॉन 3 वादात सुनील शेट्टीने रणवीर सिंगचा बचाव केला आहे. चित्रपट सोडल्याच्या तक्रारीनंतर त्याच्यावर FWICE (फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉयज) द्वारे बंदी घालण्यात आली होती. म्हणजे, वाद संपेपर्यंत फेडरेशनशी संबंधित कोणतीही व्यक्ती त्यांच्यासोबत काम करू शकत नव्हती. यावर सुनील शेट्टीचे म्हणणे आहे की, कोणालाही कोणत्याही अभिनेत्यावर बंदी घालण्याचा अधिकार नाही. त्याचे म्हणणे आहे की,…

Read More

इचलकरंजीत काळजाचा ठोका चुकवणारा अपघात!:भरधाव कार थेट बसस्थानकातील गर्दीत घुसली; वृद्धेचा जागीच मृत्यू, 5 जखमी

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. एक भरधाव अनियंत्रित कार थेट बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीत घुसल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुख्य चालकाने पळ काढला, मात्र काही वेळाने दुसऱ्याच एका तरुणाने ‘मीच…

Read More

शेलूबाजार येथे तोतया अन्न प्रशासन अधिकाऱ्याचा पर्दाफाश:कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून पैशांची मागणी, नागरिकांकडून चोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही भामटे स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी म्हणून भासवून व्यापारी व व्यावसायिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार…

Read More

कारहुणवी सणावर दुष्काळाचे सावट:सलगरमध्ये पाऊस नसल्याने उत्साह मंदावला‎

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा कारहुणवी सण यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त साजरा होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात या सणाला विशेष महत्त्व असून, बैलांचा साजशृंगार करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे कारहुणवी सणावर दुष्काळ व अनावृष्टीचे…

Read More

वेरूळ घाटामध्ये झाड कोसळल्याने 30 मिनिटे वाहतूक झाली विस्कळीत:वाहनधारक ताटकळले, प्रशासनाकडून तातडीने झाड हटवून मार्ग मोकळा‎

तालुक्यातील वेरूळ घाटात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे ३० मिनिटे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. . बुधवारी रात्री अचानक हवामानात बदल होऊन परिसरात जोरदार वारे व पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याचा फटका घाट परिसरातील अनेक झाडांना…

Read More

जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित:अर्ज करण्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत मुदत – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासकीय जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा.जी सी. यांनी केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल…

Read More

जळगाव शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता शिंदे:तर उपाध्यक्षपदी डोंगरे

प्रतिनिधी | लासूर स्टेशन जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता बाळकृष्ण शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर काशिनाथ डोंगरे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, जळगाव (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे शनिवारी नुकतीच पालकांची बैठक आयोजित कारण्यात आली होती. ८ वर्गामधून ९ सदस्य निवडून…

Read More

Urvashi Rautela Slams Toxic AI Photos; Actress At Cannes 2026

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर अभिनेत्रींमध्ये होणारी तुलना आणि फॅन वॉरवर नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने एआय (AI) च्या मदतीने एक फोटो तयार केला होता, ज्यात उर्वशीसह ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांच्या स्टारडमची तुलना केली होती. यावर प्रतिक्रिया देताना उर्वशीने याला ‘टॉक्सिक’ (विषारी) म्हटले…

Read More

सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ; 77,300 वर:निफ्टीही 100 अंकांनी वाढला; आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जास्त खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच 2 जुलै रोजी वाढ झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 400 अंकांच्या वाढीसह 77,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्ये 100 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तो 24,100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज IT आणि मेटल शेअर्समध्ये जास्त खरेदी आहे. आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल घसरण झाली परदेशी गुंतवणूकदारांनी…

Read More