Headlines

टेक महिंद्राचा नफा 28% नी वाढून ₹1,465 कोटी:पहिल्या तिमाहीत महसूल 17.6% वाढला, कंपनीचे एकूण उत्पन्न ₹15,605 कोटी होते

टेक महिंद्राचा आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित नफा वार्षिक आधारावर (YoY) 28% वाढून ₹1,465 कोटी झाला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत (Q1FY26) कंपनीला ₹1,140 कोटींचा नफा झाला होता. आज (16 जुलै) रोजी कंपनीने पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत. निकालांपूर्वी टेक महिंद्राचा शेअर 1.13% वाढून 1,515 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात शेअर…

Read More

डिझेल-ATF वर निर्यात शुल्क वाढले, पेट्रोलवर कमी झाले:देशात इंधनाची कमतरता रोखण्यासाठी निर्णय घेतला, नवीन दर 16 जुलैपासून लागू

केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधन म्हणजेच ATF च्या निर्यातीवर लागणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. तर दुसरीकडे पेट्रोलच्या निर्यातीवर लागणारा कर कमी केला आहे. डिझेलच्या निर्यातीवरील शुल्क ₹8.50 वरून वाढवून ₹15.50 प्रति लिटर केले आहे. म्हणजेच यात प्रति लिटर 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ATF म्हणजेच विमानासाठीच्या इंधनावरील निर्यात शुल्क ₹7.50 वरून वाढवून…

Read More

खत-बियाणे विक्रेत्यांचा संप पेटला:साताऱ्यात 2500 दुकाने ठप्प, खरीप तयारीला फटका

राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी (खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेते) आजपासून बेमुदत संप पुकारल्याने सातारा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कृषी सेवा केंद्रे बंद राहण्याची शक्यता असून, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध होणार नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या संपामागील प्रमुख कारण म्हणजे कंपन्यांकडून राबवली…

Read More

पोलिसांकडे तक्रार दिल्याने डोक्यात दगड मारला:पुण्यातील कर्वे रस्त्यावर तरुणाला गंभीर जखमी केले, आरोपी फरार

पुण्यात पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावर शुभम गोफणे नावाच्या आरोपीने कृष्णा रामचंद्र ढगे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे. कृष्णा रामचंद्र ढगे (वय ३१, रा. रामनगर, वारजे माळवाडी) हे चालक असून, आरोपी शुभम गोफणे त्यांच्या…

Read More

Modi Strong Leader, Well Jump in Sea If Asked

मोदीजी कोणत्याही रात्री काहीही बंद करू शकतात, असे म्हटले आहे. तसेच मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू, असे विधान भाजप नेते व आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. देशातील सद्यपरिस्थितीवरून विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोद . प्रमोद जठार कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले, आमचा नेता मजबूत आहे. देशातील सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या…

Read More

पेट्रोल पंपावर तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या:माथेफिरू प्रियकराने गळा चिरून संपवले, संभाजीनगरच्या करमाडमधील घटना;VIDEO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा, लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केला. या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, करमाड येथील गणपती मंदिराजवळ…

Read More

चोरट्यांनी पोलिस बनून पाच लाखांचे दागिने लुटले:पुण्यात दोन घटना, ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत गुन्हे दाखल

पुण्यात पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. कोथरूड आणि पाषाण परिसरात रविवारी हे प्रकार घडले असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला प्रकार कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडला. जनवाडी परिसरात राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी नऊ वाजता पत्नीसह दुचाकीवरून भूगावला जात…

Read More

रोहित पवारांचे CID च्या रिकाम्या खुर्चीला निवेदन:रिकाम्या खुर्चीलाच जबाब नोंदवून घेण्याची मागणी; अघोरी पूजेविषयी बारामतीच्या नेत्याचा उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी येथील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन बीएनएसएस कलम 180 अंतर्गत आपला जबाब नोंदवण्याची विनंती केली. त्यांच्या या गांधीगिरीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी…

Read More

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर एका स्कार्पिओ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी-वापी भागातील…

Read More

वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत

वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल लागल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दोन तीन कंपन्यांमुळे व त्यांच्या वाढत्या प्रदूषणाने तापमानात वाढ होत असून, कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते…

Read More