Headlines

चिखलदऱ्यात रुजणार ‘मधुपर्यटन' संकल्पना:आमझरीच्या मधाला नव्या वाटा मिळवून देण्यासाठी झटणार 3 संस्था

मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या मेळघाटमधील आमझरीचे मध आता सर्वदूर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी तीन संस्थांनी आपसात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एमओयू झालेल्या या तीन संस्थांमध्ये ग्रामपंचायत, वन विभाग व खादी-ग्रामोद्योग महामंडळाचा समावेश आहे. हा ऐतिहासिक एमओयू जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल भवनात पार…

Read More

अद्याप तोडगाच नाही; कर्मचाऱ्यांचे आंदोलन:काळ्या फिती लावून काम, उद्यापासून देण्यात येणार धरणे‎

विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जिल्ह्यात तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांसह विद्यापीठाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. दरम्यान आगामी सोमवारपासून भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे, निदर्शने केली जाणार आहेत. शुक्रवार, १४ मेपासून हा लढा सुरु झाला. महासंघाचे अध्यक्ष…

Read More

'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका तुम्ही करायला पाहिजे होती:शत्रुघ्न सिन्हा यांनी गुलशन ग्रोवर यांना म्हटले, अभिनेत्याने सहमती दर्शवली

अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी सांगितले की, अलीकडेच शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांना सांगितले होते की, ‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेली रहमान डकैतची भूमिका त्यांनी करायला पाहिजे होती. खरं तर, गुलशन ग्रोवर सध्या त्यांच्या आगामी ‘मटका किंग’ या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहेत. याच दरम्यान त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जुन्या ट्रेंड्सच्या पुनरागमनावर भाष्य केले. ‘इंडिया टुडे’शी बोलताना ग्रोवर म्हणाले…

Read More

सलग 300 रविवार शहरात राबवले स्वच्छता अभियान:धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा सलग ३०० रविवार स्वच्छतेचा विक्रम

धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाने रविवारी ऐतिहासिक टप्पा गाठला. सलग ३०० व्या रविवारी भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मंदिर परिसरातील सुमारे पाच ते सहा टन कचरा, प्लास्टिक, झुडपे आणि गवत हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, धर्मवीर युवा…

Read More

अब्दुल सत्तार-अंबादास दानवे आमनेसामने; गळाभेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना नवे बळ:समृद्धीवर योगायोग की संकेत?

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना सोमवारी आणखी खतपाणी मिळाल्याचे चित्र दिसून आले. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर अचानक भेट झाली. विशेष म्हणजे, अवघ्या एक दिवसापूर्वी दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे दोन गट भविष्यात एकत्र यावेत, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राजकीय…

Read More

नेत्यांसाठी कठोर नियम; 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास खुर्ची धोक्यात:पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत एकच नियम; उज्ज्वल निकमांची माहिती

देशातील राजकीय व्यवस्थेत मोठे बदल घडवणारा कायदा आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. कोणताही लोकप्रतिनिधी, मग तो पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, जर तो सलग 30 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिला, तर त्याला संबंधित पदावर कायम राहता येणार नाही, असा कायदा करण्याचा विचार…

Read More

दिव्य मराठी स्टिंग:सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट

घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगकाँगच्या सायबर माफियांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा प्रवास ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे….

Read More

IG च्या मानेवर दगड लागला, पोलिसांकडून गोळीबार:अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाटलीपुत्र स्टेशनवर उमेदवारांच्या गोंधळाचे 15 फोटो

पाटलीपुत्र रेल्वे स्टेशनवर शिपाई भरती परीक्षेच्या उमेदवारांनी रात्री उशिरा जोरदार गोंधळ घातला. व्यवस्थेवर नाराज झालेले विद्यार्थी ट्रेनच्या इंजिनवर चढले. विद्यार्थ्यांनी ट्रॅकवर उतरून गाड्या थांबवल्या. प्रवासी गाड्यांवर दगडफेकही करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही दगड फेकण्यात आले. यात सेंट्रल रेंजचे आयजी जितेंद्र राणा यांच्या मानेला दुखापत झाली आहे. प्रकरण इतके वाढले की उमेदवारांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे…

Read More

अर्थखाते मिळत नसल्याने सुनेत्रा पवार नाराज:राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली खंत; मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेलांची गैरहजरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले…

Read More

विद्यापीठाच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात कुलगुरू डॉ. बारहाते यांचे प्रतिपादन

कोणत्याही संस्थेच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळेच विद्यापीठ उभे राहू शकले, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. ते विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. हा ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र…

Read More