Headlines

हिंगोलीत एसटीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला:मालेगाव-बाळापूर प्रवासात 2.80 लाखांचे दागिने लंपास




मालेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावर बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधील 2.80 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 25 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव (जि. वाशीम) येथील गणेश शिंदे हेआखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहतात. गावाकडे काम असल्यामुळे शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांसह गावी मालेगाव येथे गेले होते. त्यानंतर शनिवारी ता. 25 ते दुपारी अकोला ते नांदेड या बसमध्ये मालेगाव येथून बसले होते. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. यामध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मालेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावर त्यांच्या ट्रॅव्हल बॅगमधून 1.40 लाख रुपये किंमतीचे एक तोळा वाजनाचे सोन्याचे गंठण, तसेच 1.40 लाख रुपये किंमतीचे पाच ग्रामचे सोन्याचे मनी व पाच ग्राम वजनाचे सोन्याचे पेन्डाल असा एक तोळा वजनाचे दागिने असा 2.80 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. दरम्यान, शिंदे कुटुंबिय आखाडा बाळापूर येथे पोहोचल्यानंतर घरी गेले. ्त्यानंतर त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यात दागिने आढळून आले नाही. चोरट्यांनी दागिने पळविल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला ओह. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार बालाजी जोगदंड यांच्या पथकाने बसस्थानक परिसरात पाहणी केली आहे. जमादार जोगदंड पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *