Headlines

गुरूवर्य स्व.अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण:मंडळाच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‎

गुरूवर्य स्व.अंबादासपंत वैद्य यांनी सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी १९१४ मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर वाटचाल करीत आहे. गुरूवर्य स्व. अंबादासपंत वैद्य यांच्या कार्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी, या संस्थेतून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू निर्माण व्हावेत याकरता संस्थेच्या सर्वांगीण विकासाची नितांत गरज आहे.प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तीमत्व पाहता जिल्ह्याचा…

Read More

नामांकित बिल्डरकडून 150 ग्राहकांना 50 कोटींचा गंडा:फ्लॅट न देता फसवणूक केल्याप्रकरणी समीर जैनवर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील केसनंद येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे १५० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर समीर रवींद्र जैन यांच्याविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनेक वर्षे घरांचा ताबा न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. समीर जैन हे ‘रविनंदा लँडमार्क’ कंपनीचे संचालक असून, ते मार्केटयार्ड येथील अरिहंत हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी आहेत. ‘रविनंदा टॉवर्स…

Read More

चार दिवसांत 500 अतिक्रमणे हटवली:मनमाडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, राजकीय विरोध झुगारून प्रशासनाची धडक कारवाई; शहरातील रस्ते झाले रुंद‎

शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने सलग चौथ्या दिवशीही वेग कायम ठेवत मोठी कारवाई केली. चार दिवसांत सुमारे ५०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळे झाले असून वाहतूक व्यवस . बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे पुलाजवळील परिसर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

तामिळनाडू निवडणुकीत थलापतींचा विजय:बॉलिवूड आणि साऊथच्या कलाकारांनी केले अभिनंदन; टायगर श्रॉफ म्हणाला- लोकांचा तुमच्यावरील हा विश्वास पाहणे अद्भुत

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये आणि कलांमध्ये तमिळ अभिनेता थलापती विजय यांचा ‘तमिळगा वेत्री कडघम’ (TVK) पक्ष आपल्या पहिल्याच निवडणुकीत ११० जागांवर आघाडी घेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या विजयाबद्दल बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी विजय यांना अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने लिहिले, “विजय सर यांना खूप खूप…

Read More

पुसली धरणात बुडून 3 सख्ख्या भावंडांचा मृत्यू:तिघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले, अंघोळीला गेल्याने घडली दुर्घटना

अमरावती जिल्ह्यातील पुसली धरणात 3 चिमुकल्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हे तिघेही रविवारपासून बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह सोमवारी दुपारी धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले. एकाच घरातील 3 हसतीखेळती मुले एकाचवेळी काळाच्या पडद्याआड केल्यामु्ळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पंकज संतुलाल उईके (10), प्रिया संतुलाल उईके (8) व पवन संतुलाल…

Read More

आषाढी वारीत विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या:महावितरण संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश; हयगय झाल्यास कारवाई

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पालखी मार्गावर चोख विद्युत सुरक्षा ठेवण्यासाठी विविध कामांचा आढावा घेतला. सुरक्षेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

Rishi Kapoor Interesting Facts; Amitabh Bachchan – Dimple Kapadia Affair

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक ३० एप्रिल २०२० आजपासून ६ वर्षांपूर्वी सकाळी बातमी आली की ऋषी कपूर आता नाहीत. काही दिवसांपूर्वीपर्यंत ते गंभीर अवस्थेत असूनही हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना हसवत होते, तर कधी गाणी ऐकवत होते. दैनिक भास्करशी बोलताना ऋषी कपूर यांची एकुलती एक मुलगी रिद्धिमा म्हणते, ‘सर्व काही अचानक घडले, तो खूप भयानक दिवस होता. अचानक एक…

Read More

बंगाली अभिनेत्याच्या मृत्यूवर सौरव गांगुलीचे विधान:म्हटले- ते पाण्यात गेलेच का?; अभिनेत्री म्हणाली- तुम्ही AC मध्ये राहता, तुम्हाला मजबुरी समजणार नाही

बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या मृत्यूच्या प्रकरणात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचे एक विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. खरं तर राहुलचा मृत्यू ओडिशात शूटिंग करत असताना पाण्यात बुडून झाला होता, ज्यावर सौरव यांनी प्रश्न विचारला होता की ते पाण्यात गेलेच का. यावर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. स्वस्तिका म्हणाल्या की, एक…

Read More

उदयनराजे अन् मीच अंपायर, शिवेंद्रसिंहराजेंची नगरसेवकांना थेट कानउघाडणी:साताऱ्यात क्रिकेटपेक्षा राजेंच्या वक्तव्याचीच जास्त चर्चा

साताऱ्यात क्रिकेट आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानात उतरून जोरदार फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मात्र, त्यांच्या खेळीपेक्षाही त्यांच्या राजकीय शैलीतील वक्तव्यांचीच अधिक चर्चा रंगली. खासदार उदयनराजे भोसले आणि आपण अंपायर असल्याचे सांगत…

Read More

मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका:CM देवेंद्र फडणवीसांचे विधान, म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर देखील त्यांनी भाष्य केले…

Read More