Headlines

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सुनेने संजय गायकवाडांना सुनावले:म्हणाल्या- शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेताय?; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूर येथे बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गोविंद पानसरेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून ते संपवणे अशक्य आहे, तसेच त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही सक्षम विचार नाही, अशा शब्दांत मेघा पानसरे यांनी आमदार…

Read More

वसमत तालुक्यात थरार:मुलाचा पत्ता न सांगितल्याने वडिलांना मारहाण, दुचाकी पळवली; 9 जणांवर गुन्हा

वसमत तालुक्यातील पळशी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा पत्ता विचारण्यासाठी आलेल्या तब्बल नऊ जणांच्या टोळक्याने मुलाच्या वडिलांना बेदम मारहाण करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने घरासमोरील दुचाकीची तोडफोड करत एक दुचाकी पळवून नेली तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

साताऱ्यात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार:देशभरातील नामांकित मल्ल साताऱ्यात दाखल; छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज

सातारा शहरात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार रंगणार असून, देशभरातील नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने साताऱ्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद आणि राजेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पैलवान साहेबराव पवार यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कुस्ती सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या…

Read More

Google AI Edge Gallery App: Offline AI on Phone

न्यूयॉर्क9 तासांपूर्वी कॉपी लिंक आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाउड, सर्व्हर आणि सतत इंटरनेट कनेक्शनशिवाय चालत नव्हते. पण हा ट्रेंड आता बदलू लागला आहे. गुगलने AI Edge Gallery नावाचे असे ॲप सादर केले आहे, जे AI ला थेट स्मार्टफोनमध्ये आणते. म्हणजे, वापरकर्ता आपल्या फोनवरच गामा-4 सारखे मॉडेल चालवू शकतो, तेही इंटरनेटशिवाय. हा बदल केवळ एक नवीन ॲप…

Read More

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

विराट कोहलीच्या समर्थनार्थ अमीषा पटेल:जर्मन मॉडेलच्या फोटोला लाईकमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर म्हणाली- हे काही पाप आहे का

क्रिकेटपटू विराट कोहली, इंस्टाग्रामवर एका जर्मन मॉडेलच्या फोटोला लाईक करून चर्चेचा विषय बनले आहेत. काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत, तर काही त्यांची टीका करत आहेत. याच दरम्यान अभिनेत्री अमीषा पटेल, क्रिकेटपटूच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कोणाच्याही फोटोला लाईक करणे हे काही पाप नाही. नुकत्याच मुंबईत दिसलेल्या अमीषा पटेल यांना विराट…

Read More

सिंबायोसिस विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ:राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे एआय युगावर मार्गदर्शन

पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात तरुणांनी करुणा, नैतिकता आणि मानवी मूल्ये जपून नेतृत्व करावे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे लवळे, पुणे येथे शनिवारी या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख…

Read More

जवळा बाजार येथे शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन:ठाकरे गटाकडून राजीनाम्याची मागणी, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

राज्यात टीईटी परिक्षेचा पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजिनामा द्यावा अशी मागणीकरीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. २९ जवळा बाजार (ता.औंढा) येथे भुसे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या गुरुजींमध्ये तिव्र नाराजी व्यक्त…

Read More

दगडूशेठ ट्रस्टच्या 'श्रीमंत' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन:सामाजिक कार्याचा आढावा; मोहन जोशींच्या हस्ते प्रकाशन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मंदिरात झाले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कॉफी टेबल बुकमध्ये ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. या ग्रंथपुष्पाचे प्रायोजकत्व वामन हरी पेठे ज्वेलर्सने केले आहे. यावेळी वामन हरी पेठे…

Read More

पाणी पेटले!‎:उमरी, गुडधीवासीय आक्रमक, आंदाेलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार‎

प्रतिनिधी | अकोला ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटला असून शुक्रवारी हद्दवाढ भागातील नागरिकांनी भरउन्हात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. २०-२५ दिवसांनीही पाणीपुरवठा होत नसून टँकरही नियमित येत नसल्याचे म्हणत महिलांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरले. महिलांनी उन्हातच तीन ठिकाणी नादुरुस्त असलेल्या हॅन्डपंपपर्यंत अभियंत्यांनाही भर उन्हात पायी फिरवले. हॅन्डपंपांत पाइपच नसल्याने त्यातून पाणी आले नाही….

Read More