Headlines

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कुर्डुवाडीत सत्ताधारीच उतरले उपोषणाला:सभापती संजय टोणपे यांचे आंदोलन

कुर्डुवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शहरातील प्रलंबित विकासकामांसह शाळा-महाविद्यालयांती ल विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आता सत्ताधारी लोकप्रतिनिधीच आक्रमक झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नागरी समस्यांचे विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ, नगरपरिषदेचे शिक्षण समिती सभापती संजय टोणपे यांनी गुरुवार, दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू…

Read More

90 वर्षांच्या आजीची मोठी कायदेशीर लढाई!:नातू-पणतूंना दिलेली जमीन परत मिळवली, बक्षीसपत्र अन् फेरफार रद्द; लातूरमधील प्रकरण

वृद्धत्वाकाळात मुलांकडून किंवा नातवंडांकडून संगोपन आणि देखभालीची अपेक्षा ठेवून हक्काची जमीन नावावर करणाऱ्या एका ९० वर्षीय आजीला प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. संपत्ती नावावर करून घेतल्यानंतर आजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नातू आणि पणतूला लातूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जोरदार चपराक दिली आहे. लातूर तालुक्यातील कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी नातू आणि पणतूच्या नावावर केलेले आठ एकर जमिनीचे बक्षीसपत्र…

Read More

'शूटर' सिनेमा पाहून गर्लफ्रेंडवर झाडल्या 3 गोळ्या:4 लाखांची सुपारी देणाऱ्या पती-पत्नीसह महाराष्ट्रातून 9 जणांना बेड्या

छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यात झालेल्या पूर्णिमा चौहान हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पतीने पत्नीसोबत मिळून गर्लफ्रेंडला मार्गातून दूर करण्यासाठी 4 लाखांची सुपारी दिली होती. गर्लफ्रेंड पूर्णिमा विवाहित बॉयफ्रेंडवर लग्नासाठी दबाव टाकत होती. दोन नकाबपोश तरुणांनी घरात घुसून तरुणीवर 3 गोळ्या झाडल्या होत्या. चौकशीत आरोपींनी सांगितले की, शूटर्सनी ‘शूटर’ चित्रपट पाहून ही घटना घडवून आणली. पत्नी चंपाने…

Read More

SIAC State Entrance Exam Aug 2; Free UPSC Training By Chandrakant Patil

उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET-2026-27) आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये केंद् . मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उच्च शिक्षण विभागअंतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) मुंबईसह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र…

Read More

शेतीच्या शाश्वततेसाठी हवे एकात्मिक प्रयत्न:आ. सावरकर यांचे प्रतिपादन, कृषी विद्यापीठाचा पाणी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार‎

शेती व ग्रामीण भागाचा विचार करता देशांतर्गत कृषी विद्यापीठे व तत्सम संशोधन संस्थांच्या निरंतर प्रयत्नातून काळसुसंगत फायदेशीर शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे गावखेड्याकडील शेतकरी विशेषतः युवावर्ग शे . आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी शेती ही शाश्वत होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाशी संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, पाणी…

Read More

प्रताप सरनाईकांवर नरेंद्र मेहतांचा गंभीर आरोप:म्हणाले- तुमच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली, मंत्रिपदाचा राजीनामा द्या

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “प्रताप सरनाईक यांनी छळल्यामुळे आणि मानसिक त्रास दिल्यामुळेच एका व्यक्तीने आत्महत्या केली,” असा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणीही…

Read More

शेळावे आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त:सहापैकी पाच उपकेंद्रे आरोग्य सेविकेविना; रुग्णांचे होतायत हाल, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा‎

Marathi News Local Maharashtra Jalgaon Many Posts In Shelave Health Center Are Vacant, Five Out Of Six Sub centers Are Without Health Workers; Patients Are Suffering, Villagers Warn Of Agitation शेळावे13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेळावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला असून, आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. संपूर्ण केंद्राचा…

Read More

एस.टी. महामंडळात नोकरभरतीची मोठी संधी!:तब्बल ३३,००० पेक्षा जास्त पदे रिक्त; चालक-वाहकांच्या जागांचाही समावेश

महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक परिवहन महामंडळात (एस.टी.) ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ग-१ ते वर्ग-४ प्रवर्गामध्ये एकूण ३३,०५१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या चालक, वाहक आणि कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहे. ईटीआयएम मशीन्स, ओआरएस प्रणाली आणि प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावरील अनेक पदे तात्पुरती गोठवण्यात आली असली, तरी प्रवासी सेवेशी संबंधित…

Read More

देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान:मुसळधार पावसातही भक्तिमय वातावरण, नव्या चांदीच्या रथातून पादुकांचा सोहळा

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज देहूतून उत्साहात प्रारंभ होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाने काही निर्बंध लागू केले असले, तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम असून संपूर्ण देहूनगरी “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. पुढील 18 दिवसांचा पंढरपूरच्या दिशेने निघणारा हा भक्तिमय प्रवास आज सुरू होत आहे. संत तुकाराम महाराज मंदिर फुलांच्या…

Read More

RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडले असून, हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी करत त्यांच्या शासकीय वाहनाची मोठी तोडफोड केली आहे. याप्रकरणी खदान मालक महेश भोईर याचे…

Read More