उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एससींचे आरक्षण संपवण्याचा डाव:अशोक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींचे आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करत अशोक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटना, पॅक्टोने (फुले- शाहू- आंबेडकर शिक्षक संघटना) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. उपवर्गीकरणाचा हा निर्णय थेट संविधानावर आघात करणारा असल्याचा घणाघाती आरोप निवेदनात करण्यात आला…