Headlines

औंढ्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला शिवागीळ:पदोन्नतीवरून झाला वाद, अंगणवाडी मदतनीसावर अदखलपात्र गुुन्हा दाखल

औंढा नागनाथ येथे पदोन्नतीच्या कारणावरून बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेस शिवीगाळ करून शासकिय कामास मज्जाव करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० सायंकाळी अदखलपात्र गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील अंगणवाडीमध्ये मागील १० वर्षापासून कल्पना यंबल ह्या मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदोन्नतीसाठी पात्रताधारण केल्यांनतर काही दिवसांपुर्वी…

Read More

पुण्यात बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ:व्यापाऱ्याला 2 कोटींच्या खंडणीची धमकी, आठवडाभरातील तिसरी घटना

पुणे शहरात बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा एका मोठ्या व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर शुभम लोणकर याच्या नावाने पुण्यातील एका बड्या व्यापाऱ्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या सात दिवसांतील पुण्यात बिश्नोई गँगकडून खंडणी मागण्याची ही तिसरी घटना आहे. या लागोपाठ येणाऱ्या…

Read More

मुलीचा अंत्यसंस्कार, 3 तासांनंतर आईला मुलगा झाला:म्हणायची- भाऊ झाला तर राखी बांधेन; गोरखपूरमध्ये शिपायाने बलात्कार करून ठार मारले

गोरखपूरमध्ये शिपायाने ज्या 10 वर्षांच्या मुलीवर स्मशानात बलात्कार करून तिला मारले होते, तिच्यावर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर 3 तासांनी आईने एका मुलाला जन्म दिला. आई आणि बहिणींनी मुलाचा चेहरा पाहिला तेव्हा त्या ढसाढसा रडू लागल्या. त्या म्हणू लागल्या की, मुलीची इच्छा होती की या वेळी रक्षाबंधनाला आपल्या भावाला राखी बांधावी, पण त्याआधीच…

Read More

जिल्हाधिकारी डुडींचे चाकण एमआयडीसी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश:राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडीएच्या रस्त्यांचा समावेश

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसीच्या अखत्यारीतील रस्त्यांचा समावेश आहे. मुदतीनंतर रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी…

Read More

केरलमच्या वायनाडमध्ये भूस्खलन, एकाचा मृत्यू, अनेकजण अडकले:ढिगारा पाण्यासोबत वाहून रस्त्यावर आला; बोगद्याच्या बांधकाम स्थळावर अपघात

केरलममधील वायनाडमध्ये पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक अडकल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली. येथे मलप्पुरम-वायनाड बोगदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. बोगद्यातून माती काढून बाहेर जमा करण्यात आली होती. पावसामुळे माती सरकली, त्यामुळे झाडे उन्मळून पडली आणि बॅरिकेड्सही वाहून गेले. पोलीस…

Read More

सिंधुदुर्गला ‘भूमाफियां’चा विळखा?:6 हजारांहून अधिक झाडांची कत्तल, डोंगर सपाटीकरणाचे जयंत पाटलांचे गंभीर आरोप

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातील जमिनीच्या व्यवहारात कथित बनावट कागदपत्रे आणि सहहिसेदारांची परवानगी न घेता अकृषक व विकास परवानग्या देण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी यापूर्वी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. आता त्याच…

Read More

लोकसभेचे कामकाज पहिल्यांदा वंदे मातरमने सुरू झाले:6 कडव्यांनंतर सभागृह तहकूब करण्यात आले; राज्यसभेतही असेच घडले

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाची शेवटची बैठक गुरुवारी पहिल्यांदाच वंदे मातरमने सुरू झाली. यावेळी पंतप्रधान मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि संपूर्ण सभागृह उपस्थित होते. राष्ट्रगीताचे सहा अंतरे वाजवण्यात आले. यानंतर लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आणि पावसाळी अधिवेशन संपले. राज्यसभा देखील राष्ट्रगीतासोबत अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्द्वानी येथील रामलीला…

Read More

ठरावांची अंमलबजावणी रखडली; अधिकाऱ्यांचे टोचले कान:सभांमध्ये झालेल्या ठरावांवर चर्चा, विकासकामांच्या फाइली किंवा तक्रारी प्रलंबित न ठेवण्याची दिली तंबी

मनपाच्या सर्वसाधारण सभेतील आणि स्थायी समितीच्या सभेतील ठरावांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आजवर विविध सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रशासनाकडून काय अंमलबजावणी झाली, तसेच विकासकामांची प्रगती कुठपर्यंत पोहोचली, याचा आढावा घेण्यात आला. अ . या बैठकीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि एनयूएलएम विभागांतर्गत झालेल्या ठरावांवर चर्चा झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी तिन्ही विभागांच्या…

Read More

व्यावसायिकाच्या मुलांनी 7 पोलिसांना चिरडले:एका कॉन्स्टेबलचा पाय मोडला, हात-चेहऱ्यावर जखमा; मेरठमध्ये इनोव्हा-थारने शर्यत लावत होते

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ऑटो पार्ट्स व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 पोलिसांना चिरडले. यात एका कॉन्स्टेबलचा पाय मोडला. दोघांच्या हाताची त्वचा सोलवटली, तर इतरांच्या तोंडाला आणि नाकाला दुखापत झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोमवारी समोर आले. यात दिसत आहे की, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी रस्त्याच्या कडेला…

Read More

दूध, खाद्यतेलांप्रमाणे मद्यात भेसळ खपवून घेणार नाही:पेयजलांच्या गुणवत्तेवरही आता बारकाईने लक्ष – तुकाराम मुंढे

खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून, गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग यावर आमचे बारकाईने लक्ष आहे . प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक आणि अंतरात्म्याला फॉलो केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, अशा…

Read More