Headlines

मुंबईत चर्चगेटजवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग:8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल, सुदैवाने जीवितहानी नाही




मुंबई येथील चर्चगेटजवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग बेसमेंटमध्ये लागली असून ही आग नेमकी का लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आज अचानक आग लागल्याने परिसरात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागली त्यावेळी कार्यालयात काही कर्मचारी उपस्थित होते, मात्र आगीची माहिती मिळताच त्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. तरीही या गडबडीत काहीशी धावपळ उडाली. सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, इमारतीमध्ये आणखी कोणी अडकले आहे का, याचाही कसून शोध घेतला जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयातील तळमजल्यावर सोमवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले असून, इमारतीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. हळूहळू पसरत चाललेल्या या भयंकर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *